नाही..नाही.. एप्रिल फुल असेल !

शिरूर , ता. ९ नोव्हेंबर २०१६ (सतीश केदारी) : पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी ५०० व १००० च्या नोटा चलनातुन हद्दपार केल्यानंतर सोशल मिडियावर जोक्स चा एकच महापुर अाला तर अनेकांनी या धाडसी निर्णयाचे स्वागत केले.तर ग्रामीण भागात देखिल विविध गमती जमती घडत असल्याचे पहावयास मिळत अाहेत.

पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी अचानकच  ५०० व १०००च्या नोटा चलनातुन  हद्दपार  करण्याची काल (ता.८)रोजी सायंकाळी  उशिरा घोषणा केली. त्या निर्णयाचा ग्रामीण अर्थकारणावर देखिल दुरगामी परिणाम होणार असला तरी ग्रामीण भागातील जनतेने देखिल उत्स्फुर्त स्वागत केले तर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या अाहेत. जुन्या नोटा वापरात असतानाच बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयाने सामान्य व मध्यमवर्गियांना देखिल काहि प्रमाणात झळा निर्णय जाहिर केल्यानंतरच बसु लागल्या अाहेत.

अनेक ठिकाणी राञी पासुनच गैरसोय होत  असल्याचे पहावयास मिळत होते.दुसरीकडे ग्रामीण भागातील एटीएम मशीन्स वर देखिल लांबच लांब रांगा दिसुन येत होत्या.पेट्रोल पंपावर देखिल ५०० च्या नोटा सुट्टया करण्यासाठी अनेक वाहनचालक गर्दी करत असल्याचे चिञ दिसत होते.विविध रेस्टॉरंट, हॉटेल वर जेवायला गेलेल्या ग्राहकांना देखिल या निर्णयाचा फटका बसला असल्याचे राञी उशिरा जाणवत होते. तर सर्वसामान्य बिनधास्त असले तरी व्यापारीवर्गात देखिल अस्वस्थता असल्याचे सायंकाळी बोलताना जाणवत होते.

या धाडसी घेतलेल्या निर्णयामुळे सर्वच स्तरांतुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन होत  असुन फेसबुक च्या वॉल वर अभिनंदनाच्या पोस्ट ओसंडुन वाहत अाहेत .ट्विटर वर देखिल अनेकांना ट्विट करुन मोदींच्या निर्णयाची खिल्ली तर दुसरीकडे प्रशंसा करुन टिवटिवाट जोरात सुरु अाहे. व्हॉटस्अप वर तर सगळ्यात  जास्त नेटीझन्स सक्रिय असल्याचे प्रकर्षाने दिसु लागले असुन 'मोदींचे सर्जिकल स्ट्राईक...सगळे राजकारणी राञीत भिकारी..,मोदी खतरनाक  माणुस..पण दयाळु तेवढाच..त्यामुळे ब-याच लोकांना अटॅक येणार असल्याने७२ तास हॉस्पिटलमध्ये नोटा चालतील..,नाही..नाही..एप्रिल फुल असेल, पाचशेची नोट म्हणाली शंभरला," अाता संपलो कि गं अापण..वाइट  वाततयं खुप,हजाराची नोट म्हणाली पाचशेला," नको लावुन घेउन मनाला.. समाधान वाटु दे जीवाला..संपलो वगैरे काहि नाही ..काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करताना शहिद झालोय अापण..!, नरेंद्र मोदींचं स्वच्छता अभियान बघता बघता रस्त्यावरुन  तिजोरीपर्यंत अालयं अशा प्रकारचे मेसेजेस व्हायरल होत  असुन गल्लोगल्ली व सकाळपासुन गावच्या पारावर अमेरिकेची निवडणुक व मोदींच्या या निर्णयाची चर्चा मोठ्या प्रमाणावर  ऐकायला मिळत अाहे. 

काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक केले पण कसे ?

*काळ्या पैशाबाबत विशेष तपासणी पथक स्थापन
*परदेशांत ठेवलेला काळा पैसा साठ टक्के कर भरून तीन महिन्यांत जाहीर करण्यासाठी २०१५ मध्ये कायदा संमत.
*बॅंक व्यवहारांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांबरोबर करार.
*भ्रष्टाचारातून मिळालेल्या काळ्या पैशाला (बेनामी व्यवहार) आळा घालण्यासाठी ऑगस्ट २०१६ पासून कडक कायदा अस्तित्वात.
*मोठा दंड भरून काळा पैसा जाहीर करण्यासाठी योजना

चलनातील ५०० व १०००च्या  नोटा रद्द केल्यानंतर...

*सध्याच्या नोटा बँकेत, पोस्टात जमा करेण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत
*पाचशे, हजारच्या नोटा बॅंका, टपाल कार्यालयांत १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान जमा करा
*पाचशे व दोन हजारच्या नव्या नोटा चलनात येणार
*काही दिवस बॅंकेतून पैसे काढण्यावर मर्यादा
*बॅंकेतून एका दिवशी दहा हजार, तर आठवड्याला एकूण वीस हजार काढता येणार
*जुन्या नोटा बदलण्यासाठी आधार, पॅन कार्डसारखे सरकारी ओळखपत्र आवश्‍यक
*नोटा बदलण्यासाठी १० ते २४ नोव्हेंबर दररोज चार हजारांची मर्यादा
*२५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत ही मर्यादा वाढणार 
*३० डिसेंबरनंतर नोटा जमा करण्यासाठी घोषणापत्र आवश्‍यक
*एटीएम  (ता.९) व काही भागात १० नोव्हेंबरला बंद
*एटीएममधून पैसे काढण्यावर प्रतिदिन २ हजार मर्यादा
*काही दिवसांनतर ही मर्यादा ४ हजारांवर नेणार
*मानवतावादी दृष्टिकोनातून ७२ तास सवलत
*सरकारी रुग्णालये, सरकारी रुग्णालयांतील औषध दुकाने (डॉक्‍टरांच्या प्रीस्क्रिप्शनसह) नोटा स्वीकारणार
*रुग्णांच्या कुटुंबीयांना याचा फायदा होणार
*रेल्वे तिकीट बुकिंग, सरकारी बस, विमान तिकिटासाठी जुन्या नोटा स्वीकारणार
*सरकारी कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर नोटा स्वीकारणार
*स्मशानभूमीत नोटा स्वीकारणार
*या सर्वांना जुन्या नोटांचे तपशील ठेवावे लागणार
*धनादेश, डिमांड ड्राफ्ट, डेबिट, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंगवर कोणतीही मर्यादा नाही

अर्थक्रांतीचे प्रणेते काय म्हणतात?

अनिल बोकील हेच या क्रांतीचे प्रणेते असुन याबाबत त्यांनी मोदी सरकारने अतिशय धाडसी निर्णय घेतला आहे. हा एक सुखद धक्का आहे. पोस्टमार्टमपूर्वीचे हे महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत ५०० व १०० रुपयांच्या नोटांचे मूल्य सर्वाधिक म्हणजे ८५-८६ टक्के आहे. यानिमित्ताने काळ्या पैशाला आळा घालण्याच्या सरकारच्या धोरणाला पूरक असे पाऊल उचलले गेले आहे. यासाठी अर्थक्रांती प्रतिष्ठान गेली १६ वर्षे प्रयत्न करीत आहे. या चळवळीतील हा महत्त्वाचा टप्पा आहे. याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांचे मनापासून आभार मानतो.अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली अाहे.

या निर्णयानंतर काय-काय होणार?

दररोज चार हजारांची मर्यादा
पाचशे आणि हजारच्या नोटा बॅंका आणि टपाल खात्यात जमा करण्यासोबत त्या कमी रकमेच्या नोटांमध्ये बदलून मिळतील. यासाठी पॅन कार्ड, आधार आणि मतदार ओळखपत्र यासारखे सरकारी ओळखपत्र गरजेचे आहे. ही सुविधा १० ते २४ नोव्हेंबरपर्यंत असून, याला प्रतिदिन चार हजार रुपयांची मर्यादा असेल.

अखेरची मुदत ३१ मार्च

पाचशे आणि हजारच्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत ज्यांना जाहीर करणे शक्‍य होणार नाही, त्यांना पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत घोषणापत्र देऊन ओळखपत्राच्या आधारे रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयांकडे नोटा जमा करता येतील.

बेकायदा व्यवहार बंद
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याने आता ऑनलाइन व्यवहारांचा वापर वाढणार आहे. परिणामी, अनेकांना आता व्यवहार ऑनलाइन करावा लागणार असल्याने सर्व व्यवहार कायद्याच्या चौकटीत येणार आहेत. परिणामी, बेकायदा व्यवहार बंद होण्यास मदत मिळेल.

स्पष्टीकरण द्यावे लागणार

देशातील काळा पैसा  उघड होण्याची शक्‍यता वाढली असुन काळा पैसा बाळगणारे बरेच लोक पाचशे आणि हजाराच्या नोटा वापरतात. आता मोदी सरकारच्या या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्या लोकांना त्यांच्याकडील नोटा जमा करताना त्याबद्दलचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या