शिरुर च्या पुर्व भागात भाजपाला खिंडार पडणार ?

मांडवगण फराटा , ता. ११ नोव्हेंबर २०१६ (प्रतिनीधी) : सुमारे पंचवीस वर्षांच्या यशापयशाच्या काळात खंबीरपणे खांद्याला खांदा लावुन काम करणारे आमदार बाबुराव पाचर्णे यांचे कट्टर समर्थक  भारतीय जनता पार्टीला लवकरच रामराम ठोकणार असल्याचे वृत्त अाहे.


शिरुर च्या पुर्व भागात गेल्या पंचवीस वर्षांपासुन पक्ष न मानता आमदार बाबुराव पाचर्णे यांना दैवत मानुन कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता प्रत्येक निवडणुकित पक्षाचे निष्ठेने काम करणा-या घोडगंगा सहकारी कारखान्याच्या माजी संचालिका लतिकाताई जगताप यांच्यासह मांडवगण सोसायटीचे माजी संचालक शंकरराव फराटे हे लवकरच पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती.


या संदर्भात नाराज असलेल्या जगताप व फराटे यांनी संकेतस्थळाशी संवाद साधताना सांगितले कि, वेळोवेळी पुर्व भागात पक्षवाढीसाठी प्रयत्न केला पण काहि कार्यकर्त्यांकडुन अामच्याबद्दल अामदार बाबुराव पाचर्णे यांच्याकडे सतत कानभरणी केली जात असल्याने अामदारांचे देखिल अामच्याकडे लक्ष कमी झाले अाहे.पक्ष सत्तेत नसताना देखिल अामदार बाबुराव पाचर्णे यांना खंबीर साथ दिली.त्यावेळी माञ अाता पक्षात नवीन अालेले व पुर्वाश्रमीचे दुस-या पक्षातील नेते पाचर्णे यांच्या विरोधात अाक्रमक होते.त्यावेळी अडचणीच्या काळात देखिल अाम्ही साथ दिली. पक्षात अाम्हांला व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्यामुळे नाराज असल्याचे लतिकाताई जगताप व शंकरराव फराटे यांनी सांगितले.

याबाबत अामदार बाबुराव पाचर्णे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि,मी त्या कार्यकर्त्यांना सरपंचापासुन ते संचालकांपर्यंत अनेक पदे देउन वेळोवेळी न्याय द्यायचा प्रयत्न केला अाहे.तसेच माझ्या राजकिय जीवनात त्यांचे देखिल अाम्हांला सहकार्य लाभलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत मांडवगण फराटा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव फराटे यांनी सांगितले कि, साहेबांच्या विश्वासाने प्रत्येक वेळी त्यांना साथ दिली परंतु नवीन समर्थक त्यांच्या जवळ आल्यावर आम्हाला वाळीत टाकण्यात आले आहे.तसेच घोडगंगा सहकारी कारखान्याच्या माजी संचालिका लतिकाताई जगताप म्हणाले कि,माझी इच्छा नसताना देखिल मला भाजपच्या शिरुर तालुका महिला अाघाडीचे पद देण्यात अाले होते.पण मध्यंतरी कौंटुबिक झालेल्या अाघाताने एक-दोन मिटिंगला हजर राहता अाले नाही. दिलेल्या पदाबाबत  मला कोठेहि विचारात न घेता पदमुक्त करण्यात अाले.तर पदमुक्त करण्याचे जे कारण  देण्यात अाले अाहे त्याची पार्श्वभुमी देखिल वेगळ्या स्वरुपाची अाहे.तसेच अामचा अामदारांविषयी कोणताही रोष नाही.असेही त्यांनी सांगितले.

अागामी निवडणुका व नाराज कार्यकर्त्यांनी दिलेला पक्षाला इशारा यामुळे या घटनेचे दुरगामी परिणाम होणार का?  असा सवाल सर्वसामान्यांकडुन होत अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या