अाजार एकीकडे; उपचार माञ भलतीकडेच

टाकळी भीमा ,  ता.१६ नोव्हेंबर २०१६ (जालिंदर अादक) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत अचानक  ५०० व १०० च्या नोटा स्विकारण्यावर बंदी घातल्याने  सर्वसामान्यांचा गोंधळ उडाला असुन या बॅंकेवर अवलंबुन असणा-या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असुन अाजार एकाला तर उपचार माञ भलतीकडेच अशी परिस्थिती निर्माण झाली अाहे.

रिझर्व बॅंकेने या संदर्भात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला परिपञक पाठवले असुन त्यानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखांनी अाज  'कोणत्याही स्वरुपात  ५०० व १००० च्या नोटा स्विकारल्या जाणार  नाहीत  अशाप्रकारची नोटीस देखिल लावली अाहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या  शिरुर तालुक्यातील शाखांनी  राष्ट्रियीकृत बॅंकांपेक्षा सर्वात  जास्त खाती मोलमजुरी करणा-या महिला,शेतकरी, यांची अाहेत. या मध्ये मोलमजुरी करणारा वर्ग हा जिल्हा बॅंकेवर  अवलंबुन अाहे. पै-पै साठवुन बचत करणा-या महिला बचतीची ठेव भरणा करण्यासाठी अाल्या असता बचतीची रक्कम ही जास्त असल्याने स्विकारली जात नव्हती.

जिल्हा सहकारी बँक ही ग्रामीण भागातील जनता,  शेतक़र्‍यांची जिव्हाळ्याची बँक आहे.  शेतीसाठी घेतलेले अल्प,  मध्यम अथवा दीर्घ मुदतीचे कर्ज असो,  शेतीशी संबंधित अन्य कर्जप्रकरणे असोत किंवा उसाचे मिळणारे बिल असो.  ग्राहकांची मोठ्या प्रमाणात खाती जिल्हा बँकेतच आहेत.  ही बँक शेतक़र्‍यांना आणि ग्रामीण भागातील कष्टक़र्‍यांना जवळची वाटते.  त्यामुळे या बँकांमध्येच ग्राहकांची वर्दळ आहे.  परंतु रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानंतर जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये मोठी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे.
 
खातेदार त्यांच्याकडे पैसे बदलण्यासाठी येत आहेत. परंतु चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारू नयेत,  असे आदेश असल्याने ग्राहकांना तोंड देता देता जिल्हा बँकेच्या अधिकाऱी व कर्मचा़र्‍यांना नकोसे झाले आहे.  जिल्हा बँकेत जुन्या नोटा घेतल्या तर ग्राहकांसाठी ते अधिक सोयीचे होईल.  फार तर जिल्हा बँकेतील खात्यांच्या तपशिलाबाबतही सरकारने आवश्यक ती माहिती घ्यावी; परंतु बँकेवर टाकलेले हे बंधन काढावे,  अशी मागणी होत आहे.  ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या फारशी नाही.  त्यामुळे पैसे बदलण्यासाठी,  पैसे काढण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांवर मोठा ताण निर्माण होत आहे.  हा ताण जिल्हा बँकेच्या शाखाच कमी करू शकतील अशी सध्याची परिस्थिती आहे;  परंतु त्यांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आल्याने मोठी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असणार्‍या जिल्हा बँकेतील व्यवहार ठप्प होणार असून, सर्वसामान्य शेतकर्‍यांनी आपले पैसे भरायचे कुठे, कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

जिल्हाबॅंकेत नोटबंदीमुळे अाज सर्वच शाखांनी गर्दी कमी असल्याचे चिञ  दिवसभर दिसत होते.
 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या