शिरुर नगरपरिषद निवडणुक ; अर्ज छाननीत१३ अर्ज बाद

शिरूर, ता. २२  नोव्हेंबर २०१६ (सतीश केदारी) : शिरुर च्या बहुचर्चित  नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्जछाननीच्या दिवशी छाननीत ११३पैकी १३ अर्ज बाद झाले अाहेत.

शिरुर नगपालिका निवडणुकिसाठी सुमारे ११३ अर्ज दाखल झाले होते.काल(ता.२१)रोजी अर्ज छाननी करण्यात अाली.या  झालेल्या छाननीत
अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये भाजपाच्या राजश्री कुंडलिक शिंदे (प्रभाग ६), पल्लवी मितेश गादिया (प्रभाग ८ ब), वैशाली विलास लोळगे (१0 ब) यांचा समावेश आहे. इतर उमेदवारांत नगराध्यक्षपदासाठी असलेल्या ज्योती सीताराम डोळस (अपक्ष), नगरसेवकपदाचे उमेदवार नीलेश आदिनाथ कोळपकर (प्रभाग ५ अ), श्रीया दिनेश टेमगिरे (प्रभाग ५ ब), तुषार सुभाष जांभळे (६ ब), किरण मधुकर पाटील (६ ब) व सय्यद पीर मोहंमद हुसेन यांचा समावेश आहे.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशाली वाखारे व नगरसेवकपदाचे उमेदवार दादाभाऊ वाखारे यांच्याबाबत त्यांचे श्रीगोंद्यातील हिंगणी गावात अतिक्रमण असल्याबाबत हरकत घेण्यात आली. आघाडीचे नेते प्रकाश धारिवाल यांनी दिवाळीत झोपडपट्टय़ांमध्ये मिठाईवाटप केल्याने आचारसंहितेचा भंग झाला, अशी हरकत घेण्यात आली. मनीषा गावडे यांची अर्जावर एक सही करायची राहून गेली. अविनाश मल्लाव यांनी अर्जासोबत त्यांचे मतदान ज्या वॉर्डात आहे, त्या वॉर्डाच्या यादीची झेरॉक्स लावली नाही. अर्ज बादसाठी हा आक्षेप ठेवण्यात आला. विनोद भालेराव यांच्याबाबतही अतिक्रमणाची हरकत घेण्यात आली होती.दादाभाऊ वाखारे यांनी आपल्या पत्नीच्या (वैशाली) व स्वत:च्या उमेदवारी अर्जावर एकच सूचक घेतल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. मनीषा गावडे व अविनाश मल्लाव यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला.  
दरम्यान,सायंकाळी  उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी गलांडे यांनी निर्णय देत वैशाली वाखारे, प्रकाश धारिवाल, विनोद भालेराव यांच्या बाबतचे अपील फेटाळले. त्यामुळे या तिघांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला.

शिरुर नगरपालिकेत काल दिवसभर सुनावनी असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात अाला होता.नागरिकांनी देखिल सुनावनी वेळी मोठी गर्दी केली होती.नगपालिकेला काल एक प्रकारे निवडणुक निकालाचे स्वरुप अाले होते.
शिरुर नगरपालिकेत अातापर्यंत नाटयमय घडामोडी घडल्या असल्या तरी शेवटपर्यंत काय होते? हात मिळवणी होणार कि स्वबळावर लढणार याबाबत संदिग्धता असुन सर्वसामान्यांना पुढे काय होणार ? या बाबत उत्सुकता निर्माण झाली अाहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या