संधी मिळाल्यास सर्वसामान्यांसाठी काम करणार-हिंगे

निमोणे, ता. २३  नोव्हेंबर २०१६ (सतीश केदारी) :  सर्वसामान्य कुटुंबातील एक असणा-या व दातृत्व अाणि कर्तृत्व याच्या जोरावर शुन्यातुन विश्व निर्माण करत शिरुर शहर व तालुक्यात परिचित असलेल्या भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिलीप हिंगे यांच्याशी केलेली ही बातचीत...

प्रश्न : तुमचे बालपन कसे गेले?
पुर्वी घरची परिस्थिती तशी गरीबीची त्यामुळे भविष्यात नोकरी न करता  व्यवसाय करायचा हे मनोमन ठरविलेले.त्यामुळे गरीब सर्वसामान्य कुटुंबात बालपन गेले.

प्रश्न :व्यवसायाची सुरुवात कशी झाली ?
नोकरी करायची नाही हे लहानपणासुन ठरविले असल्याने व्यवसायाच्या दृष्टीने वाटचाल करायचे प्रयत्न सुरु केले होते.पण ते ध्येय देखिल वाटते तितके सोपे मुळीच नव्हते.शिक्षण पुर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रिक रिपेअरिंग च्या दुकानापासुन ख-या अर्थाने व्यवसायास सुरुवात करत व्यावसायिक क्षेञात पदार्पन केले.त्यावेळी उत्पन्नाचे साधन देखिल नसल्याने कमी भांडवलात व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवली.

प्रश्न :व्यवसायात कशी गरुडझेप घेतली?
सन २००६ साली इलेक्ट्रिक रिपेअरिंग च्या दुकानापासुन सुरुवात केलेली होती.त्यात प्रारंभी पासुन अावड निर्माण झाली असल्याने न थकता कित्येक तास काम करत रहायचो.परंतु थकवा,तणाव कधीच जाणवला नाही कारण त्या कामातुन देखिल मोठा अानंद मिळत असायचा.त्यामुळे यातुनच भांडवल कसे उभे करायचे हे शिकलो.त्यातुन दोनच वर्षात कारेगाव ला श्रद्धा इलेक्ट्रॉनिक्स चे दुसरे दुकान सुरु केले.त्या ठिकाणी देखिल अपेक्षित यश मिळत गेले अन पाच वर्षात तालुक्याच्या ठिकाणी स्वत: चे मोठा व्यवसाय सुरु करता अाला. तसेच या दिवाळीत वाघोली या ठिकाणी नवीन शाखा सुरु केली असुन त्या ठिकाणी देखिल सर्वसामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळत अाहे.

प्रश्न :तुमच्या दातृत्वाविषयी ऐकुन अाहे. काय सांगाल?
खरं अाहे.मी लहानपणासुन गरीबी च्या झळा सोसल्या अाहेत.अनेक वाईट अनुभव देखिल घेतले अाहे.त्यामुळे कोठेहि जास्त प्रसिद्ध न करता अाजपर्यंत विशेष मुलांच्या संस्था, गरीब मुले,अनाथ बालके,वंचित घटकांना अार्थिक मदत देउ केली अाहे.त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना देखिल प्रगतीसाठी पाठबळ देत असुन विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी अाजतागायत न चुकता शालेय वस्तु,गनवेश वाटप करत असतो.

प्रश्न :लहाण मुलांच्या शिक्षणाविषयी तुम्ही जास्त अाग्रही असता ?
हो.अापण देश सुधारला असे म्हणतो परंतु अार्थिक व इतर अडचणीमुळे अाजही अनेक बालकांना शिक्षणापासुन वंचित राहावा लागत अाहे.हिच  बाब मनाला न पटनारी असुन या मुलांच्या शिक्षणासाठी जास्त मी  अाग्रही असतो.त्याचबरोबर शिरुर च्या ग्रामीण भागातील अनेक शाळांनी वेळोवेळी भेट दिल्यानंतर पाण्याच्या अाजाराने मुलांमध्ये गैरहजेरीचे प्रमाण जास्त अाढळले.त्यावर उपाय म्हणुन अामदार बाबुराव पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर तालुक्यातील व अासपास च्या इतर भागात देखिल गरजेनुसार सुमारे ३५ पाणी शुद्धिकरण यंञे मोफत बसवुन दिले अाहेत.त्यामुळे अाज त्या त्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये अाजाराचे प्रमाण तर कमी झाले अाहे परंतु हसरे चेहरे पहावयास मिळाल्याच्या अानंद मिळतो अाहे.

प्रश्न :शेतक-यांसाठी नेहमीच नावीन्यपुर्ण उपक्रम तुम्ही राबविता अाहात ?
शेतकरी टिकला तरच देश टिकेल.या सर्व समाजातील समस्या बारकाईने अनुभवल्या असल्याने शेतकरी सक्षमतेसाठी नेहमीच प्रयत्नशील असतो.त्यामुळे व्यवसाय करत असताना समाजहिताचे भान ठेवुन प्रसंगी तोटा सहन केला अाहेत.अाजतागायत कमी किंमतीत सुमारे १२ हजार ८०० पाणी शुद्धिकरण यंञे वाटप केली अाहेत.चालु वर्षी अत्याधुनिक औषध फवारणी पंप शेतक-यांसाठी कमी किंमतीत उपलब्ध केली असुन एकुन १५०० पंपांचे वाटप देखिल केले अाहे.शेतकरी देखिल हक्काने पंपासाठी अाग्रही अाहेत.

प्रश्न :राजकारणाकडे कसे अाकर्षिले गेले?
राजकारणाची अावड तशी लहाणपणासुनची.अामदार पाचर्णे साहेब यांचे व पक्षाचे विचार हे पुर्वीपासुनच अावडायचे.त्यामुळे भारतीय जनता पार्टी च्या कार्यक्रमांना अावर्जुन हजेरी लावायचो.त्यातुनच काम व पक्षावरील निष्ठा पाहुन अामदार बाबुराव पाचर्णे  यांनी विश्वास दाखवुन व्यापारी अाघाडी सेल ची जबाबदारी सोपविली.इथेही निष्ठेने काम केल्याने भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पद देउ केले अाहे.या पदाची जबाबदारी सोपविल्यानंतर देखिल प्रत्येक समाजाला व प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न केला असुन ६१ जणांची मुख्य व १५० कार्यकर्त्यांची कार्यकारिणी तयार केली असुन या माध्यमातुन तळागाळातील प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात अाहे.त्याचबरोबर दीड हजार च्या वर कार्यकर्ते देखिल जोडण्यात अाले अाहे.या पुर्वी तालुकाभर सदस्य नोंदणीसाठी विशेष प्रयत्न केले अाहेत.त्यामाध्यमातुन २००० सदस्य नोंदणी केली अाहे.

प्रश्न :पंचायत समिती साठी इच्छुक असल्याची चर्चा अाहे. काय सांगाल?
अाजपर्यंत प्रत्येक काम गोरगरीब जनतेसाठी करत अालो अाहे.पक्षाने जर संधी दिली तर शिरुर ग्रामीण या पंचायत समिती गणातुन निवडणुक लढविण्याचा  विचार अाहे.पंचायत समिती च्या  माध्यमातुन  देखिल प्रसिद्धी न करता गोरगरीब जनतेसाठी भरीव काम करण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या