बंधा-यात पाणी टिकणार तरी कसे?

सादलगाव
सादलगाव
सादलगाव
सादलगाव
सादलगाव
सादलगाव
सादलगाव
सादलगाव
सादलगाव
सादलगावसादलगाव, ता.१ डिसेंबर २०१६ (संपत कारकूड) : मांडवगण फराटा व सादलगाव येथील भिमा नदीवरील कोल्हापुर पद्धतीच्या बंधा-याला पन्नास टक्के जुन्या व जिर्ण झालेले लोखंडी ढापे वापरल्यामुळे चालु वर्षी साठविलेले पाणी बंधा-यात टिकणार तरी कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सादलगाव, ता.१ डिसेंबर २०१६ (संपत कारकूड): मांडवगण फराटा व सादलगाव येथील भिमा नदीवरील कोल्हापुर पद्धतीच्या बंधा-याला पन्नास टक्के जुन्या व जिर्ण झालेले लोखंडी ढापे वापरल्यामुळे चालु वर्षी साठविलेले पाणी बंधा-यात टिकणार तरी कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सार्वजनिक पाटबंधारे विभागाकडुन दरवर्शी शेडयुलप्रमाणे भिमा नदीवरील बंधा-यांवर गेट टाकण्याचे काम ठेकेदारांकडुन केले जाते. ढापे कमकुवत झाल्यामुळे अथवा तुटल्यामुळे नवीन ढाप्यांची मागणी प्रत्येक वर्षी ठेकेदारांकडुन प्राधान्याने केली जाते. परंतु गेली पाच वर्षापुर्वी बनविण्यात आलेल्या बंधा-यांच्या ढाप्यानंतर अद्याप एकदाही नवीन ढापे उपलब्ध करुन दिलेले नाहीत. जुनेचे ढापे वापरुन पाणी अडविले असून जर ढाप्यांची तुटफुट झाली तर कित्येक एकर शेतीला याचा फटका बसणार आहे. बंधा-यावरील पाण्याचा दाब आणि वापरण्यात आलेली लोखंडी गेट याचे कोणतेही मुल्यमापन न करता फक्त करावयाचे म्हणुन काम करायचे, झाले नुकसान तर शेतक-यांचे होणार? याबाबत सार्वजनिक पाटबंधारे व बंधा-यावर काम करणारे कर्मचारी बेदखल असल्याची बाब यानिमित्त समोर येत आहे. गेल्यावर्षी या दोन्ही बंधा-यावरील शेतीला पाण्याचा मोठा फटका बसला असताना चालु वर्षीही जुने ढापे वापरुन मागील वर्षाप्रमाणे होते की काय? अशी शंका यावरील शेतक-यांच्या मनामध्ये आहे.

50 टक्के गेट खराब
वरील सर्वच बंधा-यावरील जवळपास सर्वच लोखंडी गेटची क्षमता अत्यंत नाजुक झाली असून वापरण्यात आलेल्या गेटला मोठाले छिद्र आहेत. सादलगाव बंधा-याला एकूण 850 लोखंडी गेटची आवश्यकता असून मांडवगण फराटा येथील बंधा-याला 790. पैकी 50 टक्के गेट हे वापरण्या अयोग्य असतांनाही वापरण्यात आलेले आहेत. ठेकेदाराला जे गेट पुरविले आहेत ते गेली पाचवर्षापुर्वी बनविण्यात आले आहे. वापरुन वापरुन ते कमकुवत झाले आहेत. जुन्या वापरलेल्या ढाप्यांना पाण्याच्या दाबाने ते केव्हाही भगदाड पडु शकते. तसेच मोठया प्रमाणात पाण्याचीही गळती होवू शकते.

वडगाव रासाई , ता. २७  नोव्हेंबर २०१६ (प्रतिनीधी)
- See more at: http://www.shirurtaluka.com/index.php?shr=more_news&hid=4055#sthash.soK9jxBd.dpuf

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या