तळेगावात पेन्शनर्स असोसिएशनचे अधिवेशन संपन्न

तळेगाव ढमढेरे, ता.२ डिसेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : येथे पेन्शनर्स असोसिएशनचे वार्षिक अधिवेशन नुकतेच संपन्न झाले.या अधिवेशनास  शिरूर तालुक्यातील सुमारे 25 गावातील 80 सेवानिवॄत्त राज्य सरकारी कर्मचारी व प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.

तळेगाव ढमढेरे येथे आयोजित या अधिवेशनात सेवानिवॄत्त पेन्शनधारक कर्मचा-यांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.त्यामध्ये प्रामुख्याने सातवा वेतन आयोग, केंद्र व राज्य शासकीय निवॄत्त कर्मचा-यांच्या पेन्शनमधील तफावत दूर करण्याची मागणी, थकीत महागार्इ भत्यातील फरक, हयातीचे फॉर्म भरून घेणे, बँकेत पेन्शनधारकांचे संयुक्त खाते उघडणे, पेन्शन विक्री 15 वर्षानंतर बंद होणे, पेन्शन भत्ता मिळणे आदी बाबींची सविस्तर चर्चा झाली.

निवॄत्त कर्मचा-यांच्या अडचणी व समस्या संघटनेच्या पदाधिका-यांनी समजून घेतल्या.शासन दरबारी मागण्यांचे निवेदन देवून पाठपुरावा करण्याचेही निश्चित करण्यात आले.

या कार्यकमास महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुभाष कुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष खुशालराव मोरे, नानासाहेब शिर्के, तालुकाध्यक्ष प्रभाकर मुसळे, सचिव सुभाष कोळपकर, श्रीकांत ढमढेरे, चंद्रकांत जगताप, ज्ञानोबा शितोळे, मधुकर ढमढेरे, मालती कापरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बुरुंजवाडी ,  ता.३०नोव्हेंबर २०१६ (प्रा.एन.बीे.मुल्ला) - See more at: http://www.shirurtaluka.com/index.php?shr=more_news&hid=4058#sthash.6CNCPq7X.dpuf

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या