गरज समाजाची मानसिकता बदलण्याची

शिरूर, ता. ३ डिसेंबर २०१६ (सतीश केदारी) : जागतिक अपंग दिनानिमित्त विशेष बहुविकलांग,मतिमंद मुलांसाठी काम करणा-या अाकांक्षा एज्युकेशनल फौंडेशनच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी अपंग बालकांच्या व्यथा,पालकांची समस्या,समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन या विषयी व्यक्त केलेलं हे मत.


समाजात वावरत असताना अापणास ठिकठिकाणी विविध कारणाने अपंगत्व अालेली मुलं अाढळतात.सर्वसामान्यांप्रमाणे शारिरिक वाढ व्यवस्थित झाली असली तरी बौद्धिक वाढ व क्षमता कमी असणा-या मुलांना विशेष बालक म्हणतात.या मध्ये अपंगत्वानुसार त्या मुलांचा विचार केल्या गेल्यास  मतिमंद, बहुविकलांग, त्याचबरोबर सेरेब्रल पाल्सी, अॉटिझम, डाउनसिंड्रोम अशाने पिडित असलेल्या विशेष मुलांचा समावेश होतो.या मुलांसाठी  काम करणे हे एक मोठे अाव्हानात्मक काम असते. बालकांचे जसजसे वयवय वाढते तशा शारिरिक तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने मुलांचा सांभाळ करणे पालकांना अवघड होउन जाते.या मुळे  अशा बालकांना डांबुन ठेवणे, मारहाण करणे, अशाप्रकारे हीन दर्जाची वागणुक मिळते.त्याचबरोबर समाजाकडुन या बालकांबाबत तिरस्काराची वागणुक मिळत असल्याने पालक देखिल तणावात वावरत असतात.समाजातील अशा विशेष मुलांकडे नेहमी दुर्लक्ष केल्याने हि मुले शिक्षणाच्या प्रवाहापासुन दुर फेकली जातात.

समाजातील अशा शिक्षणापासुन वंचित राहणा-या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अाणुन जगण्यासाठी नवी दिशा देणे महत्त्वाचे असल्याने शिरुर शहरात अाकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन कार्यरत असुन या संस्थेने शिरुर व परिसरातील अशा मुलांचा नुकताच सर्व्हे केला असुन त्यात अनेक धक्कादायी बाबी समोर अाल्या अाहेत.शिरुर शहर व परिसरात अशी सुमारे ४० ते ५० मुले केवळ पालकांच्या मानसिकतेमुळे शिक्षणापासुन वंचित राहत असल्याचे अाढळले अाहेत या मुलांच्या शिक्षणासाठी व किमान जीवन जगण्यासाठी संस्थेत विद्यार्थी दाखल केल्यानंतर पालकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी देखिल समुपदेशन  केले गेल्याने अाज सुमारे १६ बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात अाणण्यात  यश अाले असुन जगण्याचा हक्क मिळाला अाहे.

समाजातील अपंग विशेषत: बहुविकलांग मुलांना सक्षम करुन त्यांना समाजाच्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अाणणे अत्यंत गरजेचे असुन  यांना किमान दैनंदिन जीवन व्यवस्थित जगता यावे यासाठी मुलभुत शिक्षण दिले जायला हवे.त्यांच्या दैनंदिन जीवनातील किमान गरजा ओळखुन त्यांना स्वावलंबी बनविने हे देखिल तितकीच मह्त्वाची गरज असते.त्यानुसार अशा मुलांची बौद्धिक क्षमता ओळखुन त्यांना संस्थेत शिक्षण दिले जात अाहे. या मुळेच अाज शिरुर व पारनेर परिसरात अाकांक्षा फौंडेशन वंचित व विशेष बालकांसाठी अाशेचा किरण ठरत अाहेत.

समाजाने या  मुलांच्या मतिमंद,अस्थिव्यंग, कर्णबधिर,दृष्टिहिन अशा अंपगत्वाकडे न पाहता सुप्त गुणांना वाव दिल्या गेल्यास  समाजाच्या प्रवाहात राहुन या वंचितांना किमान शिक्षण मिळुन जगण्याचा हक्क तर नक्कीच मिळु शकतो.
परंतु  त्यासाठी पालकांनी व  समाजाने या मुलांकडे पहायचा दृष्टिकोन बदलायला हवा...
 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या