युवक कॉंग्रेस ला भगदाड; नेत्यांसह कार्यकर्ते राष्ट्रवादीत

शिरूर, ता. ३ डिसेंबर २०१६ (प्रतिनीधी) : शिरुर-हवेलीतील युवक कॉंग्रेस,भाजपा चे प्रमुख नेतेमंडळीच राष्ट्रवादीत गेल्याने शिरुर-हवेली तालुक्यातील राजकिय वातावरणात सध्या वेगळाच गारवा अनुभवयास मिळत अाहे.

शिरुर तालुका युवक कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष  प्रदिप  कंद यांच्याबरोबर शिरुर तालुका युवक अध्यक्ष विजेंद्र  गद्रे, उपाध्यक्ष महेश जगदाळे,रुपेश गंगावणे, अादींसह शेकडो शिरुर हवेलीतील  निष्ठावान कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला अाहे.

शिरुर तालुका  कॉंग्रेस चा इतिहास पाहता गेल्या तीन वर्षात पहिल्या पेक्षा चांगली काम करत होती.परंतु तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवेळी नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर  अनेक कार्यकर्ते नाराज होते.

नाराजांना सावरण्याचा देखिल पक्षाने थोडा प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला.या वेळी हीच संधी साधत राष्ट्रवादी ने नाराज  कार्यकर्त्यांची समजुत घालत पक्षात घेत  अापलेसे करुन दाखविले.दुसरीकडे भाजप मध्ये देखिल असंतोष असल्याचे दाखवत पुर्व भागातील घोडगंगेच्या माजी संचालिका  लतिका जगताप,शंकरराव फराटे अादींनी राष्ट्रवादीचा मार्ग घरला. इतके असुन देखिल अागामी काळात इतर पक्षातील कार्यकर्ते हे  भाजपात जाण्यास देखिल इच्छुक अाहेत.

कॉंग्रेस चे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा झालेला खुन, त्यानंतर केशरकाका परदेशी यांच्या धक्क्यातुन सावरत असतानाच कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी केलेला प्रवेश हा पक्षाला बसलेला मोठा धक्काच समजला जात असुन याचे पडसाद अागामी निवडणुकित निश्चित जानवणार असल्याचे राजकिय जानकारांच्या बोलण्यातुन जाणवत अाहे.त्याचबरोबर या वाढलेल्या ताकदीचा वापर राष्ट्रवादी अागामी निवडणुकित करणार का  हे पहाणे अौत्सुक्याचे ठरेल हे निश्चित.  
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या