तळेगाव ढमढेरे–न्हावरे रस्त्याची मलमट्टी सुरू

तळेगाव ढमढेरे, ता.५ डिसेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : गेल्या अनेक दिवसांपासुन अाजारी समजल्या जाणा-या तळेगाव ढमढेरे – न्हावरे रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सध्या सुरू करण्यात आले असुन खड्डे बुजवून डागडुजी करण्यात येत आहे.मात्र ठिकठिकाणी रस्ता खचलेला असल्याने व तुटलेल्या सार्इडपटयामुळे ही कामचलावू डागडूजी तग धरण्याची साशंकता असल्याने या रस्त्याचे नुतनीकरण होण्याची आवश्यकता असल्याचे मत परीसरातील नागरीकांनी व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक  दिवसांपासुन तळेगाव ढमढेरे–न्हावरे रस्त्याची दुरावस्था झाली होती.ठिकठिकाणी खड्डे पडल्याने व रस्ता खचल्याने या 27 किमी अंतर असलेल्या रस्त्यावरून वाहतुक करणे जिकीरीचे झाले होते.या रस्त्यावर दुचाकीस्वारांनाही कसरत करावी लागत होती.तळेगाव ढमढेरे–न्हावरे रस्त्याची दुरवस्था झाल्याबाबतचे वॄत्त नुकतेच प्रसिध्द झाले होते.या वॄत्ताची दखल घेउन रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.खडी व डांबर वापरून खड्डे पडलेल्या ठिकाणी मलमपट्टी करण्यात येत आहे.रस्त्याची डागडूजी करताना कमीत कमी डांबर वापरण्यात येत असल्याने बारीक खडी देखील कमी प्रमाणात वापरली जात आहे.त्यामुळे थोडयाच दिवसात रस्त्याची अवस्था 'जैसे थे'होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

रस्त्याची ही तात्पुरती डागडुजी असल्याने रस्त्याचे नुतनीकरण करून  तुटलेल्या सार्इडपट्टयाही भरण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.मात्र तात्पुरती का असेना डागडुजी होत असल्याने परीसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या