जांबूतला अपहरण, धिंड प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

जांबुत, ता.५ डिसेंबर २०१६ (प्रतिनीधी) : येथे दोन विद्यार्थिनींना पळवूननेल्याप्रकरणी व दोन मुलांना जमावाने विवस्त्र करून मारहाण केल्या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या गेल्याने शिरूर पोलिस स्टेशन ला संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबूतजवळच्या राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना प्रशांत विजय शिंदे (वय 20) व अतुल राहुल खंडीझोड (वय 20, दोघे रा. कावळ पिंपरी, ता. जुन्नर) या दोघांनी फिरायला नेले होते. संबंधित मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिंदे व खंडीझोड यांच्यासह शुभम कचरू गायकवाड व अतुल रखमा सोनवणे (दोघे रा. जांबूत, ता. शिरूर) यांनी मुलींना पळवून नेले होते. ही बाब गावातील काही मुलांना व मुलींच्या नात्यातील तरुणांना समजताच त्यांनी शिंदे व खंडीझोड यांना दर्याबाई पाडळी (ता. पारनेर) येथे पकडले. जातिवाचक शिवीगाळ करीत सुभाष दत्तात्रेय जगताप, योगेश नंदू जोरी, चंद्रकांत नाना थोरात, संपत मुळे, शिवाजी लक्ष्मण थोरात, संपत गेणूभाऊ बोऱ्हाडे, जालिंदर बाबूराव थोरात, दशरथ येदू औटी, संतोष रामभाऊ थोरात, संदीप दत्तात्रेय थोरात, बाळू औटी व डॉ. औटी (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांनी  बेदम मारहाण केली. तसेच विवस्त्र करून त्यांची गावातून धिंड काढली.

दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत शिंदे, अतुल खंडीझोड, शुभम गायकवाड व अतुल सोनवणे यांच्याविरुद्धही बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

या घटनेनंतर दलित संघटनांनी अाक्रमक पविञा घेत तक्रार दाखल करण्याची मागणी केली.त्यानुसार  या मुलांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध "ऍट्रॉसिटी'चा व मारहाणीचा गुन्हा शिरूर पोलिसांनी दाखल केला.

याघटनेनंतर पोलीसांनी तणाव निर्माण होउ नये या साठी विशेष खबरदारी घेतली असुन मोठा पोलीस बंदोबस्त तैणात ठेवला अाहे.
  • , ता.५ डिसेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला)
  • Comment Box is loading comments...

    संबंधित बातम्या