‘वॉटरलेस युरीनल पॅन’ प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर

तळेगाव ढमढेरे, ता.१० डिसेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयातील ऋचा भुजबळ हिच्या ‘वॉटरलेस युरीनल पॅन’ या प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.
 
तळेगाव ढमढेरे येथील भुजबळ विद्यालयातील ऋचा जयवंत भुजबळ या विद्यार्थीनीने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या ‘वॉटरलेस युरिनल पॅन’ या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला.या प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.

नागपूर येथील राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालिका माधुरी सावरकर यांनी नुकतेच निवडीचे पत्र दिले विद्यालयाला दिले आहे.राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय(भारत सरकार)यांच्या वतीने आयोजित 29वी पश्चिम भारत विज्ञान जत्रा 14 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबर्इ येथे आयोजित करण्यात आली आहे.या राष्ट्रीय प्रदर्शनात ऋचा भुजबळ ‘वॉटरलेस युरिनल पॅन’ या प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहे.

या प्रकल्पासाठी सुरेखा डोर्इफोडे यांनी मार्गदर्शन केले.राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल ऋचा हिचे शिक्षणाधिकारी हरूण आतार, ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासाहेब तोडकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या