शिरूरमध्ये एका मताला पाच हजार रुपयांचा भाव

शिरूर, ता. 13 डिसेंबर 2016 (प्रतिनिधी)- शिरूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका मताला पाच हजार रुपयांचा भाव फुटल्याची चर्चा असून, मतदारांना मोठ्या प्रमाणात जुन्या पाचशे व हजारच्या नोटा वाटल्या जात असल्याचे चित्र आहे. पैसे वाटण्यासाठी मतदारांची यादी, त्यांची पाकिटे आणि ती मिळण्याची ठिकाणे हे सर्व नियोजनबद्ध आहे. निवडणूक आयोगासह पोलिसांच्या हाती अद्याप काही लागले नाही. संकेतस्थळाने यापूर्वीच वृत्त दिले असूनही प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही.

नगरपालिकेच्या सत्तेसाठी नेते सर्व मार्गांचा वापर करताना दिसत आहेत. नेते पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत असून, मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न करतानाचे चित्र दिसत आहेत. यामध्ये अनेकजण हात ओले करत आहेत. परंतु, प्रशासनाला काहीही दिसत नाही, हे विशेषच म्हणावे लागले. एरव्ही सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणारे निवडणूकीवेळी कोठे असतात हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. लोकशाही क्रांती आघाडी, बहुजन समाज पक्ष व भारत मुक्ती मोर्चाकडूनही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

नोटाबंदीमुळे यंदा पैसे वाटले जाणार नाहीत, असे अनेकांना वाटत होते. परंतु, ते साफ खोटे ठरले आहे. शिरूरमध्ये ज्या प्रभागात तुल्यबळ लढती आहेत, त्या ठिकाणी मताला पाच हजार रुपयांचा भाव फुटल्याची चर्चा आहे. कमी चुरशीच्या ठिकाणी दोन हजार रुपये वाटले जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पैसे वाटण्यावरून तक्रारीही दाखल झाल्या आहेत.

रविवारी (ता. 11) रात्री आठच्या सुमारास स्टेट बॅंक कॉलनीत एका पॅनेलकडून तिकीट मिळालेल्या व तिकीट नाकारलेल्या अशा दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये मारामारीचा प्रकार घडला. या घटनेत संबंधित पॅनेलप्रमुखाने लगेच दोन्ही बाजूंना एकत्र बसवून झालेल्या भांडणावर पांघरून घातले. याचा फायदा आपल्याला होईल, या आशेवर विरोधी पॅनेलचे नेते-कार्यकर्ते आहेत.
शिरुरला अायकर विभागाने छापे टाकावेत

दरम्यान, पैसे वाटण्याच्या वीस ते बावीस तक्रारी रविवारी दिवसभरात आल्या. त्यातील एकाही तक्रारीत तथ्य आढळले नाही. तसे आढळून आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असे गावडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या