शिरुर पोलीसांनी अावळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या

शिरूर, ता. १४ डिसेंबर २०१६ (सतीश केदारी) : अाचारसंहिता लागु झाल्यानंतर ते  अातापर्यंत शिरुर पोलीसांनी विशेष मोहीम राबवुन दोन गुंडांवर तडीपारीचा तर एका गुन्हेगारावर संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव पाठविला असुन त्याचबरोबर हद्दीतील इतर गुन्हेगारांच्या देखिल मुसक्या अावळल्या अाहेत.

या बाबत शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,गेल्या दोन महिन्यांपासुन अाचार संहिता  लागु झाल्यानंतर शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष मोहीम राबविली अाहे. या मध्ये शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांची पार्श्वभुमी असणा-या २२९ जणांवर,त्याचबरोबर कलम ११० अंतर्गत २९ इसमांवर कारवाई करण्यात अाली.शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील पप्पु उर्फ सचिन बाळासाहेब राजापुरे याच्या टोळीतील ७ सदस्यांसह रेकॉर्डवरील २ गुंडांवर तडिपारीचा प्रस्ताव पाठविला अाहे.तर गुन्हेगार राजु शेवाळे स्थानबद्ध करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (एम.पी.डी.ए) अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रस्ताव पाठविलेला असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे माहिती  देताना त्यांनी सांगितले कि,भरारी पथकाच्या माध्यमातुन ५० ठिकाणी  दारुविक्री करणा-यां च्या विरोधात ६६ अारोपींवर कारवाई करण्यात अाली असुन ९,११,९५८ किंमतीचा माल हस्तगत केला.वारंवार दारुबंदी चे उल्लंघन करणा-या १३ गुन्हेगारांवर तडीपारीचा प्रस्ताव पाठविला अाहे.
वाहतुक नियमाचे भंग करणा-या १४५७ जणांवर कारवाई करुन १,६६,८०० रुपये इतका दंड वसुल करण्यात अाला अाहे.त्याचबरोबर ४८ तळीरामांवर देखिल कारवाईचा बडगा  दाखविण्यात अाला अाहे.अवैध वाहतुक करणा-या १५ जणांवर  कारवाई करण्यात येउन सुमारे १७००० रुपये दंड वसुल करण्यात अाला अाहे.

अाचारसंहिता भंगाचे चार गुन्हे दाखल झाले असुन निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली १ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३ पोलीस निरीक्षक, ८ पोलीस अधिकारी, १४० कर्मचारी, ५२ महिला व पुरुष होमगार्ड, १ राज्य राखीव दलाची तुकडी, १ क्यु अार टी तुकडी, ४५ विशेष पोलीस कर्मचारी, ५ वाहनां द्वारे मोठा फौजफाटा तैनात करण्यात अाला असुन उपविभागीय अधिकारी वैशाली कडुकर या प्रभारी अधिकारी म्हणुन काम पाहत अाहेत. या बंदोबस्ताला सहायक प्रभारी अधिकारी म्हणुन गावडे हे काम पाहत अाहेत .

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या