कवठे येमाईत मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी

कवठे येमाई, ता.१४ डिसेंबर २०१६ (अकबर पिंजारी) : येथे मुस्लिम सुन्नी जमातीच्या वतीने अायोजित केलेली मोहंमद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.                    

या वेळी कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणुन शिरुर चे माजी अामदार पोपटराव गावडे  हे उपस्थित होते.या प्रसंगी शुभेच्छा देताना गावडे यांनी, मोहंमद पैगंबर यांनी महिला व आई वडील यांच्याविषयी आदर व समाजाबद्दल दिलेल्या एकतेच्या विचारांचे आचरण करण्याचे आज समाजाला गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी भिमाशंकर साखर कारखाना संचालक प्रदिप वळसे पाटील, डॉ सुभाष पोकळे, मुस्लिम ओबीसी संघटना शिरुर तालुकाध्यक्ष अल्ताफ तांबोळी, उपसरपंच अरुण मुंजाळ, सोसायटी उपाध्यक्ष बाळासाहेब ढोबळे, सागर रोहिले, चांदा गावडे,मुस्लिम जमातीचे अध्यक्ष रशिद मोमीन, कानिफनाथ हिलाळ गणेश रत्नपारखी आदी मान्यवर उपस्थित होते.

मोहंमद पैगंबर जयंती निमित्त मशिदीमध्ये सलाम पठाण, कुराण पठण, फातेहाखानी अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मौलाना अब्दुल रजाक यांनी मोहंमद पैगंबरांचे विचाराबद्दल समाजाला माहिती दिली. संध्याकाळी मक्का मदिना येथील गुम्मजच्या प्रतिकृतीची फुलांनी सजविलेल्या रथातुन गावातुन मिरवणूक काढण्यात आली.

यामध्ये जेष्ठ नागरिक, लहान मुले व मुली तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

या कार्यक्रमासाठी आसिफ तांबोळी,अरबाज अत्तार, तोसिफ तांबोळी, वजीर पिंजारी, आमिन पठाण, वसीम शेख, शरीफ तांबोळी,अफताब तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या