मेक्सिकोत आत्तापासून क्रिसमस अन नववर्षाची धामधुम

मेक्सिको,ता.१४ डिसेंबर २०१६(थेट मेक्सिकोतुन-गणेश थोपटे) :  क्रिस्मस आणि नवीन वर्षाला अजून पंधरा - वीस दिवस शिल्लक असले तरी लॅटिन अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये आतापासूनच क्रिस्मस आणि नवीन वर्षाचा फील अनुभवास मिळत आहे.

डिसेंबर महिना म्हटला कि वेध लागतात ते नवीन वर्षाचे अन् ख्रिसमस अर्थात नाताळ चे. परंतु अातापासुनच मेक्सिकोमध्ये सर्व ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मॉल आणि मोठमोठ्या शॉपिंग सेंटर मध्ये आतापासूनच विविध वस्तूंवर व कपड्यांवर ३०% पासून ते ५०% पर्यंत भरघोस  डिस्काउंट देण्यास सुरवात झाली आहे. सध्या येथील नागरिक मोठ-मोठ्या शॉपिंग सेंटर मध्ये जाऊन क्रिस्मसची खरेदी करू लागले आहेत. प्रत्येकाने आप-आपल्या घरासमोर नाताळबाबांचे विविध रूपातील बाहुले विद्युत रोषणाई करून आपल्या घरासमोर लावले आहेत.

मेक्सिकोतील सर्व स्थानिक रहीवाशी आत्तापासूनच क्रिस्मसच्या तयारीला लागले आहेत यासाठी काहींनी तर आतापासूनच नातालबाबाच्या टोप्या आणि ड्रेस घालायला सुरुवात केली आहे.ठिकठिकाणी क्रिस्मस ट्री सुद्धा विकण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.

येथील कामगारवर्गानेसुद्धा नाताळच्या सुट्टीचे नियोजन केले आहे. नाताळ एन्जॉय करता यावा म्हणून त्यांनी आतापासूनच सर्व ऑफिसची पेंडिंग कामे पूर्ण करणाचा झपाटा लावला आहे. ऑफिसमध्ये सुद्धा दिवाळी सारख्या चांदण्या लावण्यात आल्या आहेत.एकंदरीत भारतात अद्याप अवकाश असेल ही परंतु इकडे माञ भन्नाट वातावरण अनुभवण्यास  मिळत अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या