शिरुर नगरपालिका निकालाबाबत दिलगिरी

शिरुर, ता.१५ डिसेंबर २०१६ : दिवसेंदिवस अॉनलाईन चे महत्त्व वाढत चालले असुन देखिल शिरुर नगरपालिकेच्या पदाधिकारी व शिरुर मधील नेतेमंडळींना माञ अाॉनलाईन चे महत्त्व अद्याप फारसे नसल्याचे जाणवत असल्याने या निवडणुकिचे कोणतेही निकाल अथवा वृत्त संकेतस्थळ प्रसारित केले जाणार नाही.

शिरुर तालुक्याचे अाद्य संकेतस्थळ असलेले www.shirurtaluka.com हे गेल्या पाचवर्षांपासुन लोकसभा,विधानसभा,जिल्हापरिषदा,पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित महत्त्वपुर्ण भुमिका बजावत असुन निवडणुकिचे प्रत्येक झटपट अपडेट ते हि बिनचुक देत असते.त्यामुळे याही निवडणुकित वाचकांनी निकालाच्या अपडेट साठी मागणी होत अाहे.परंतु शिरुर च्या नेत्यांकडुन अॉनलाइन कडे माञ दुर्लक्ष होत अाहे.तर नगरपालिकेच्या सर्व पदाधिका-यांना देखिल अॉनलाईन चे मोठे वावडे असल्याचे दिसते.

संकेतस्थळ 'शिरुर तालुका डॉट कॉम' हे शिरुर तालुक्यासह जिल्हयात व जगभरात अधिक विश्वसनीय व लोकप्रिय संकेतस्थळ असल्याने व नेत्यांच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे या निवडणुकित निकालाचे कोणतेही अपडेट देउ इच्छित नाही.

अापल्या झालेल्या गैरसोयीबद्दल संकेतस्थळ मनापासुन दिलगिरी व्यक्त करत अाहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या