कवठे येमाई ला दत्तजन्म उत्साहात संपन्न

कवठे येमाई, ता.१५ डिसेंबर २०१६ (अकबर पिंजारी) : येथे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांची उधळण करत दत्त जन्म सोहळा मोठया उत्साहात पार पडला.

कवठे येमाई येथील गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री दत्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळात मंदिरावर पुर्ण विद्युत रोषनाई करण्यात आली होती. मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच काकड आरती अभंग वाणी पारायण सोहळा प्रवचन किर्तन हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे ग्रामस्थांकडुन आयोजन करण्यात आले होते.

मंगळवार (ता १३)रोजी पहाटे दत्त जयंती सोहळ्यानिमित्त मंदिरात रुद्राभिषेक घालण्यात आला. सायंकाळी दत्त जन्माअगोदर ह भ प मल्हारी महाराज शेवाळे यांचे दत्त जन्मावर किर्तन झाले त्यानंतर भाविकांना फुलांचे वाटप करून पाळणा व नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात उपस्थित भाविकांनी फुलांची उधळण केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या