'सायबेज' कडुन दीप तलावाचे उत्साहात लोकार्पण

आमदाबाद, ता.१५ डिसेंबर २०१६(सतीश केदारी) : लाखो रुपये खर्चुन दीप तलावाचे रुपडे पालटविणा-या सायबेज सॉफ्टवेअर कंपनीकडुन नुकतेच दीप तलावाचे मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात अाले.

या वेळी कंपनीचे संचालक दीपक नथानी, सरपंच योगेश थोरात, उपसरपंच संदीप जाधव, पोपट जाधव, नवनाथ घुले, शिवाजीराव थोरात, प्रशांत महामुनी, ऋषीकेश पवार सायबेज कंपनीचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदाबाद येथे सायबेज सॉफ्टवेअर या कंपनीच्या माध्यमातून दीप तलावात खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. त्यामुळे या पावसाळ्यात जवळपास 15 कोटी लिटर पाणीसाठा झाल्याचे येथील सरपंच योगेश थोरात यांनी सांगितले.या वेळी  ""जलसंधारणाची कामे करून पावसाचे पाणी जिरविण्यात यश आले आहे. त्यामुळे या वर्षी पावसाचे पाणी साठलेले दिसत आहे. या पाण्याचा योग्य वापर ग्रामस्थांनी करावा,'' असे मत घोडगंगा कारखान्याचे संचालक अॅड. रंगनाथ थोरात यांनी केले.

लोकार्पणानंतर अनेक ग्रामस्थांनी कंपनीने केलेल्या चांगल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले अाहे.

या कार्यक्रमाचे भास्कर थोरात यांनी सूत्रसंचालन केले.तर पोपट घुले यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या