राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत 3 खेळाडू यशस्वी

शिक्रापुर, ता.१९ डिसेंबर २०१६ (प्रा.एन.बी.मुल्ला) : राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत शिक्रापूर परीसरातील शाळांमधील 3 खेळाडूंनी यश मिळविले अाहे.

 राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे नांदेड येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत शिक्रापूर परीसरातील विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : 14 वर्षाखालील वयोगट(मुली) : द्वितीय – वैष्णवी बेंडभर(जि.प.प्राथ.शाळा.गणेगाव खालसा), 14 वर्षाखालील वयोगट(मुले) : तॄतीय – रोहन पिंपरकर(अमॄतवेल ग्लोबल स्कूल, शिक्रापूर), 19 वर्षाखालील वयोगट(मुली) : प्रथम – दिप्ती पिंपरकर(छ.संभाजीराजे उच्च.माध्य.विद्यालय, जातेगाव बुद्रुक).

या सर्व यशस्वी खेळाडूंना कराटे प्रशिक्षक सोमनाथ अभंग यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सीताराम चव्हाण, शरद फंड, संजय शिंदे, मच्छिंद्र खैरनार, युवा उद्योजक मंगेश सासवडे, शिक्षक परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.एन.बी.मुल्ला यांनी अभिनंदन केले अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या