'तो' कचरा डेपो दहा दिवसात अन्यञ हलवा

शिरुर, ता.२३ डिसेंबर २०१६ (सतीश केदारी) : गेल्या अनेक वर्षांपासुन विकासाची वल्गना करणारी शिरुर नगरपालिका हुडको वसाहती शेजारील कचरा डेपोकडे डोळेझाक करत असुन या कचरा डेपोची अातातरी गांभीर्याने दखल घेणार का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करु लागले अाहेत.

शिरुर नगरपालिका निवडणुक मोठ्या थाटात पार पडली. अनेक अारोप-प्रत्यारोप झाले.परंतु शिरुर शहरातील गेल्या अनेक वर्षांपासुनच्या प्रश्नांवर माञ सर्वच नेत्यांनी सोयीस्कर बोलणे टाळले.हुडको वसाहती शेजारील असणा-या कचरा डेपो व त्यातुन निघणा-या विषारी धुर व दुर्गंधीबाबत  माञ विकासाची वल्गना करणारी नगरपालिका का  दुर्लक्ष करत अाहे? असा सवाल नागरिक करु लागले अाहेत.

तर याबाबत शिरुर च्या  जागरुक नागरिकांनी  देखिल या प्रश्नाकडे लक्ष  वेधले असुन कचरा डेपो दहा दिवसात अन्यञ हलवावा व त्या ठिकाणी कचरा टाकणे व पेटविणे बंद करावे अशा अाशयाचे विनंतीवजा निवेदन लोकशाही क्रांती अाघाडीकडुन नुकतेच नगरपालिकेला देण्यात अाले अाहे.याबाबत काहि नागरिकांनी देखिल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असुन प्रसंगी वेगळा मार्ग निवडणार  असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

निवडणुक नुकतीच पार पडली असुन शिरुर नगरपालिका कच-याच्या या गंभीर समस्येवर किती गांभीर्याने पाहते हे पाहणे हे अात औत्सुक्याचे ठरेल. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या