शिरुर पोलीसांकडुन बेकायदा दारुअड्डे उद्ध्वस्त

नागरगाव, ता.२७ डिसेंबर २०१६ (प्रतिनीधी) :शिरुर च्या पुर्व भागातील बेकायदा दारुअड्ड्यांवर शिरुर पोलीसांनी धडक कारवाई करत दारुअड्डे उद्ध्वस्त केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एस.एस.वाघमोडे यांनी दिली.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात छुप्या पद्धतीने दारुविक्री सुरु असल्याची माहिती शिरुर पोलीसांना मिळाली होती.त्याचप्रमाने या भागात दारुधंद्यांचा सुळसुळाट झाला होता.या मिळालेल्या माहितीच्या अाधारे  नागरगाव व परिसरात शिरुर पोलीसांनी धडक कारवाई करत भिमानदीतिरी जोरात सुरु असलेली हातभट्टी जागीच नेस्तनाबुत केली.त्याचप्रमाने उसाच्या शेतात सुरु असलेल्या हातभट्टीवर देखिल कारवाई करत मोठ्या प्रमाणावर  असलेले रसायन नष्ट केले.या प्रकरणी वंदना अशोक भंडलकर, योगेश बबन गव्हाने व भाउसाहेब उर्फ लहु पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत.

या वेळी पोलीस उपनिरीक्षक एस.एस.वाघमोडे यांनी बोलताना सांगितले कि,अवैध दारु धंद्यांवर धडक  कारवाई सुरुच राहणार असुन नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करत  बेकायदा धंद्यांची माहिती कळविल्यास या धंद्यांवर अधिक तीव्र कारवाई करण्यात येईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या