राजकीय 'नेत्यां'चा सर्वसामान्य नागरिकांनाच त्रास...

शिरूर, ता. 28 डिसेंबर 2016 (प्रतिनिधी): शिरूर तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या अधिकाऱयांचा सर्वसामान्य नागरिकांनाच त्रास होत असल्याचे चित्र शिरूर तहसीलदार कार्यालयात पाहायला मिळाले. याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शिरूरचे तहसीलदार राजेंद्र पोळ हे शुक्रवारी (ता. 23) कार्यक्रमानिमित्त सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयाबाहेर होते. परंतु, याबाबतच्या कोणत्याही माहितीचा फलक कार्यालयाबाहेर लावलेला नव्हता. शिवाय, तहसीलदार कार्यालयात केंव्हा परततील, याबाबतची माहिती कोणी देऊ शकत नव्हते.

शिरूर तालुक्यातील विविध भागांमधून आलेले नागरिक तहसीलदार कार्यालयाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेमध्ये सकाळपासून बसलेले होते. या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेमध्ये असलेल्या बाकड्यांची अवस्था प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच येते. शिवाय, शौचालयामध्ये ठिकठिकाणी गुठख्याच्या पिचकाऱया पाहून अनेकांना नाक दाबून धरावे लागते. शौचालयाला काही महिन्यांपूर्वीच बसविलेला दरवाजाची अवस्था वाईट असल्याने अर्धवट उघडाच राहतो. यामुळे मोकळ्या जागेत उभ्या राहिलेल्या महिलांची कुचंबना होते. नागिरकांना अशा प्रकारे येथे वेळ काढावा लागत असून, हे नेहमीचेच झाल्याची तक्रार नागरिक करतात.

दिवसभर थकलेले नागरिक सुर्य कलू लागताच हताश होऊन घराकडे निघू लागतात. काहीजण आशेचा किरण उराधी धरून थोडावेळ वाट पाहण्याची जोखीम उचलतात. कार्यक्रम संपल्यानंतर तहसीलादार कार्यालयात येतात. अनेकजण मोठा श्वास सोडून कार्यालयाबाहेर रांग लावू लागतात. काही वेळानंतर आपला क्रमांक येईल, ही भाबडी आशा मनात बाळगतात. परंतु, तसे होत नाही.

सर्वसामान्य नागरिक क्रमांकाने कार्यालयात जात असताना एका राजकीय नेत्याचे 'जवळ'चे अधिकारी व त्यांच्यासोबत चार जण येऊन थेट कार्यालयात प्रवेश करतात. रांगेत उभे राहिलेले नागरिक एकमेकांकडे पाहतात. परंतु, ओठामधून एक उच्चार काढण्याची कोणाची हिंम्मत होत नाही. नेत्यांचे अधिकाऱयांचे 'महत्त्वाचे काम' सुरू असल्याची शक्यता वर्तविली जाते. बाहेर अंधार पडू लागल्यानंतर रांगेतील एक-एक जण घराकडे परतीचा रस्ता धरतो. कारण... त्यांना पुढील प्रवासाचा टप्पा पार पाडायचा असतो.

दरम्यान, राजकीय नेत्यांच्या अधिकाऱयांना व अगदी जवळच्या कार्यकर्त्यांना रांगेचे नियम लागू होत नाही का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. याबाबत तुम्हालाही वेगवेगळे चांगले-वाईट अनुभव आले असतील? याबाबत तुम्हाला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया बातमीखाली अथवा shirurtaluka@gmail.comच्या माध्यमातून जरूर लिहा. निवडक प्रतिक्रियांना ई-पेपरच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली जाईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या