मांडवगण ग्रामपंचायतीचे गरिबांवरच 'अति'क्रमण

मांडवगण फराटा,ता.२९ डिसेंबर २०१६ (संपत कारकूड): शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा ग्रामपंचात हददीतील निवडक दहा अतिक्रमणावर ग्रामपंचायतीने जेसीबीद्वारे कारवाई करुन घरे पाडुन टाकली असून यामध्ये मोलमजुरी करणारे पाच नागरिकांच्या तंबु वजा पालांच्या घरांसह सिमेवर लढणा-या एका सैनिकाच्या नवीन घराचा समावेश आहे.

बापु किसन कांबळे यांचे राहते पक्के घर, सैनिक आनंदा रावजी चौघुले यांचे नवीन बांधकाम, नारायण जाधव, तात्या चौघुले तसेच पाईपलाईन खोदुन उदरनिर्वाह करणारे संजय घनवट, पोपट घनवट, हौसाराम घनवट या तिघा भावांचे राहण्याचे झोपडया, रामा निंबाळकर व शंकर निंबाळकर यांचे तंबु अशी गेली वीस वर्शांपासुन वास्तवास असणा-या नागरिकांचे घरे मांडवगण ग्रामपंचायतीने जमीनदोस्त केली.

अतिक्रमण काढत असताना येथील रहिवाशांनी अतिक्रमण काढण्यासाठी तीव्र विरोध केला परंतु पोलिसांनी अतिक्रमण काढत असतांना कायदेशिर कारवाईची भाषा तसेच बळाचा वापर करुन नागरिकांना अतिक्रमण रोखण्यापासुन परावृत्त केले. अतिक्रमण काढत असतांना महिलांनी मोठा अक्रोष चालु केला.

घरातुन बाहेर न पडणा-या महिलेस बाहेर खेचून काढण्यात आले. प्रत्यक्ष अतिक्रमण काढत असताना सरपंच व ग्रामसेवकांनी अतिक्रमण कारवाईच्या सुचना देणे आवश्यक असताना बंदोबस्तासाठी असणारे शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिसच पुढाकार घेवून अतिक्रमण काढताना दिसत होते.

महिलांचा अाक्रोष अन हंबरडा
डोळयादेखत अतिक्रमण काढत असतांना महिलांनी मोठा हंबरडा फोडला. गावातील धनदाडग्यांची अतिक्रणे सोडुन आमचीच अतिक्रमणं दिसतात का? थंडीमध्ये आमची घरे मोडुने आम्हाला रस्त्यावर आणणा-या ग्रामपंचायत पुढा-यांची गावभर असणारी अतिक्रमणे का नाही काढली? ग्रामपंचायत हददीमध्ये असणारी गाव पुढा-यांनी बेकायदेशिररित्या उभी केलली दुकाने शाबुत ठेवूने आमच्या गरीबांची घरे उदवस्त करण्यामध्ये कोणती बहादुरी आहे. असे अनेक अाक्रोष गर्दीमधुन येत होते. लहान लहान मुलांसह मोलमजुरीचे कामे करणारे घनवट कुटुंब पुर्णपणे रस्त्यावर आले आहे.

सरसकट कारवाई करा: निवृत्ती थोरात गुरुजी
आमच्यावर बुलडोझर फिरविता तसे श्रीमंतीने गेली अनेक वर्शांपासुन आपल्या डोळयादेखत केलेली अतिक्रमणाला पाठीशी घालुन केवळ अत्यंत गरीब व मागासवर्गीय समाजातीलच नागरिकांना ग्रामपंचायतीने टार्गेट केल्याचा आरोप व आपला संताप व्यक्त करुन ग्रामपंचयतीने आत्तापर्यंत किती स्थानिक पुढा-यांच्या अतिक्रमावर कारवाई केली ते सांगावे, असा संतप्त सवाल येथील 70 वर्शाचे समाजसेवक थोरात गुरुजी यांनी केला असून गावामधील आजचे अतिक्रमण जसे काढले तसे गावगुंडांचे पोचलेले अतिक्रणही काढा? अन्यथा कायद्या हातात घ्यावा लागेल व होणा-या परिणामास आपणच जबाबदार असाल? अशी प्रतिक्रिया दिली.

अतिक्रमण कारवाईनंतर पडलेले प्रश्न?
  • गेली चाळीस वर्शामध्ये स्थानिकांचे कोणतेही अतिक्रमण काढले नाही.?
  • तथाकथित गावपुढा-यांनी बळकविल्या जागा व त्यावरील पक्की बांधकामे का नाही पाडली.?
  • गावभर अतिक्रमण असतांना नेमके मागासवर्गीय नागरिकांनाच टार्गेट केल्याचा संशय?
  • पोलिस स्टेशनपासुन जवळच असलेली नागरिकांना धोकादायक असलेली पाण्याची टाकी पाडण्याचे आदेश असूनही नेमके हेच अतिक्रमण का काढण्यात आले.
  • विटभटटी, दुकानांद्वारे केलेले अतिक्रमणावर का कारवाई नाही.?
  • ग्रामपंचायत हददीमध्ये नेमके किती अतिक्रमण झाले त्याची सविस्तर माहिती नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या