रामलिंग ला पाण्यात बुडुन मुलाचा दुर्दैवी मृत्यु

शिरुर,ता.३१ डिसेंबर २०१६(प्रतिनीधी) : रामलिंग येथे पोहायला गेलेल्या मुलाचा पाण्यात  बुडुन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार(ता.३०) रोजी दुपारी अडिचच्या सुमारास राज राजु सोनवणे, सागर विजय सोनवणे, अनिकेत नवनाथ निकाळजे हे रामलिंग येथील भैरवनाथ मंदिरामागील घोडनदीत पोहायला गेले होते. पोहत असताना  सागर हा पाण्यातुन वर अाला नसल्याचे अनिकेत याच्या लक्षात अाले.या वेळी अनिकेत याने घरच्यांना हि माहिती दिली.या वेळी इतर लोकांच्या मदतीने सागर याला पाण्यातुन वर काढण्यात अाले.त्याचप्रमाणे त्यास तत्काळ सरकारी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात अाले.तपासणीनंतर डॉक्टरांनी उपचारांपुर्वीच निधन झाले असल्याचे निदान केले.तरुणवयातील सागर च्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात अाहे.
या घटनेनंतर शिरुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेउन परिस्थितीची पाहणी करुन पंचनामा केला.

या प्रकरणाचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खोमणे हे करत अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या