शिरूरची पोलिस ठाणी बनतायेत 'तडजोडी'ची ठिकाणे

शिरूर, ता.३१ डिसेंबर २०१६ (प्रतिनीधी) :  शिरूर तालुक्यातील पोलिस ठाणी 'तडजोडी'ची ठिकाणे बनत असल्याचे चित्र काही दिवसांपासून दिसू लागले आहे.

शिरूर तालुक्यातील काही जण स्वःताला 'प्रतिष्ठित' समजत असून सर्वसामान्य नागरिकांचा वेठीस धरत आहेत. पोलिस ठाण्यांमध्ये नेहमीच 'उठबस' असल्यामुळे हे गरिबांच्या परिस्थितीचा फायदा घेत असल्याचे  चित्र पहायला मिळत आहे.

शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये एखादी घटना घडल्यास त्याची तक्रार दाखल करण्याचा घाट हेच 'प्रतिष्ठित' धरतात. पोलिस चौकीमध्ये तक्रार दाखल करायला लावल्यानंतर आपली 'प्रतिष्ठा' पणाला लावल्याचे दाखवून 'तडजोड' करतात. यामुळे 'प्रतिष्ठिता'चे 'खिसे' चांगलेच गरम होत असून, सध्या त्यांची जोरात चलती सुरू आहे. यामुळे पैसा कमाविण्याचे नवीन 'साधन' निर्माण होत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गावांमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष असताना व हे तंटे गावातच मिटवायचे असतानाही हे 'प्रतिष्ठित' सर्वसामान्य नागरिकांना चौकीपर्यंत नेण्याचे मोठे 'कष्ट' घेतात. सर्वसामान्य नागरिकांची चौकीत उठबस नसल्यामुळे ते अगोदरच घाबरून गेलेले असतात. याच परिस्थितीचा फायदा घेत हे 'प्रतिष्ठित' 'तडजोड' करताना दिसतात. यामुळे गरिबांच्या खिशालाच मोठा फटका बसताना दिसत आहे. या घटनेची वरिष्ठांनी दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

आवाहन
शिरूर तालुक्यात तक्रार दाखल करण्याची भिती दाखवून तुम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न करत असल्यास संबंधित फोनचे रेकॉर्डिंग shirurtaluka@gmail.com वर जरूर पाठवा. संबंधित रेकॉर्डिंग www.shirurtaluka.com व संकेतस्थळाच्या विविध सोशल नेटवर्किंगवरून सामाजिक जबाबदारी म्हणून व्हायरल केले जाईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या