निर्वीचे किरण शेलार झाले पोलीस महानिरीक्षक

निर्वी,ता.१ जानेवारी २०१६ (सतीश केदारी) : येथील किरण शेलार यांना नुकतीच पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात अाली अाहे.

किरण शेलार हे मुंबई येथे अप्पर पोलीस अायुक्त या पदावर सध्या कार्यरत अाहेत.या पुर्वी त्यांनी नांदेड जिल्ह्यात नक्षलवादी समस्या सोडविण्यासाठी, ठाणे येथे कार्यरत असताना गुन्हेगारीचा समुळ बिमोड करण्यासाठी उल्लेखनीय काम केले.त्याचप्रमाणे या पुर्वी नाशिक, धुळे, जळगाव, नांदेड, कल्याण, ठाणे,पुणे, अादी ठिकाणी सेवा बजावली अाहे.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व विशेष पथके,मुंबई) या पदावर पदोन्नती दिली अाहे.

शिरुर तालुक्यात  व निर्वी ग्रामस्थांनी शेलार यांचे अभिनंदन केले अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या