सैनिकाला हवयं हक्काचे घर;नेत्यांचे फक्त आश्वासन

मांडवगण फराटा, ता.४ जानेवारी २०१७ (संपत कारकूड): शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे 28 डिसेंबर 2016 रोजी ग्रामपंचायतीने केलेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये जमीनदोस्त केलेले सैनिक बाळु चैघुले यांचे घर सन्मानाने बांधुन मिळावे म्हणुन त्यांनी शासनाकडे समक्ष जावून विनंती अर्ज केली असून मायबाप सरकार नेमका काय निर्णय घेते? याकडे त्याचे आईवडिल व भावांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजस्थान सिमेवर देशाची सेवा करणारे मांडवगण फराटा येथील सैनिक बाळु चैगुले यांनी स्वतःचे घर कारवाईत पाडल्याचे समजल्यानंतर तातडीची रजा घेवून आपल्या गावी आलेल्या चौघुले यांनी अन्यायाची दाद मागण्यासाठी गेली आठ दिवसांपासुन त्यांनी तहसिलदार साहेब व गटविकास अधिकारी शिरुर, जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, मानवअधिकार व संभांजी बिग्रेडचे मिलिंद एकबोटे, रमाकांत एकबोटे व इतरही सामाजिक संस्थाकडे ग्रामपंचायतीकडुन झालेल्या अन्यायाची माहिती दिल्यानंतर घर देण्यासाठी प्रशासनाला विनंती केली आहे. यापैकी शिरुर चे गटविकास अधिकारी  यांनी त्वरित चौकषी करुन सर्व अहवाल तयार करुन मा. जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे सर्व माहिती पाठविल्याची माहिती सैनिक चैगुले यांच्याकडुन मिळाली असून प्रशासन यावर किती तातडीने निर्णय घेवून या जवानाला न्याय देते हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.

31 डिसेंबर 2016 च्या पुर्वसंध्येला प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देषाला उददेशुन केलेल्या भाषणामध्ये ग्रामीण भागामध्ये 33 टक्क्यांनी अधिक इंदिरा आवासअंतर्गत बेघरांना घरे बांधून देणार, असा नारा दिला असताना याउलट मात्र मांडवगण फराटा ग्रामपंचायतीने एका सैनिकासह 10 कुटुंबांना रस्त्यावर आणल्यामुळे गावामध्ये काही नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या  आहेत.

या प्रकरणात लक्ष घालणार: गिरीष बापट
दरम्यान मांडवगण फराटा ते कानगाव दरम्यान होणा-या पुलाच्या उदघाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन आलेल्या पालकमंत्री गिरिष बापट यांच्या कानावर हा विषय गेल्यानंतर त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीने पाडलेल्या घरांबददल मला माहिती मिळाली असून, यामध्ये लक्ष घालून योग्य ती मदत देण्याचे आश्वासन सैनिक बाळु चौघुले यांना मिळाले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या