पञकार हा समाजमनाचा अारसा- राजेंद्र पोळ

शिरुर,ता.७ जानेवारी २०१६(सतीश केदारी) : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पञकार हा समाजमनाचा अारसा असुन समाजाच्या विकासात मोलाचा दुवा ठरत असल्याचे प्रतिपादन शिरुर चे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी बोलताना व्यक्त केले.

दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर यांच्या स्मृतीदिन व पञकार दिनाचे औचित्य साधुन शिरुर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या वतीने शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस बांधव, महसुल कर्मचारी व सर्व पञकारांची अारोग्य तपासणी शिबिर अायोजित करण्यात अाले होते.

या वेळी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे बोलताना म्हणाल्या कि, पञकार,पोलीस हे समाजासाठी अहोराञ झटत असुन प्रसंगी कुटुंब व स्वत:कडे देखिल दुर्लक्ष करत असल्याने अारोग्याच्या तक्रारी वाढत असुन या घटकांनी अारोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.या वेळी विविध मान्यवरांनी भाषणे केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन पुजन करण्यात अाले.यानंतर तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात अाले.

तपासणी शिबिरात ह्रदयरोग, मधुमेह,हाडांची व सांध्यांची, रक्तदाब, स्ञीरोग,अादी सर्वप्रकारच्या तपासण्या करण्यात अाल्या.या शिबिरासाठी डॉ.अाकाश सोमवंशी(अस्थिरोगतज्ञ,पुणे), डॉ.सतीश व अर्चना अांधळे, डॉ.सुभाष उपलेंचवार, डॉ.अमोल खोडदे, डॉ.श्रीकृष्ण जोशी, अादींनी विशेष सहकार्य घेत पोलीस,महसुल व पञकार व नागरिकांची तपासणी केली.या तपासणी शिबिराचा १०० ते १५० जणांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर,पोलीस उपनिरीक्षक मनोज नवसारे, अंजली थोरात,अॅड.संदिप काळे, देंडगे सर, संजय बारवकर, व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पञकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित अांबेकर,तालुका उपाध्यक्ष शेरखान शेख,शहराध्यक्ष अप्पासाहेब ढवळे, अर्जुन बढे, उमेश कारखिले, जालिंदर अादक, तेजस फडके, अनिल सोनवणे,हेमंत चापुडे, अरुण मोटे, भाउसाहेब खपके, संतोष गुंजवटे, अादींनी विशेष परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या