सत्ताधारी,विरोधकांना अालाय मतदारांचा पुळका

शिरुर,ता.८ जानेवारी २०१७ (सतीश केदारी) : निवडणुकिचा ज्वर दिवसेंदिवस चढत चालला असुन भाजप राष्ट्रवादी सह सर्व पक्षांना अाता मतदारांचा पुळका  येउ लागला अाहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका  उंबरठ्यावर येउन ठेपल्या अाहेत. कोणत्याही क्षणी अाचारसंहिता  लागण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील पक्षांना मतदारांची अाठवण येउ लागली असुन त्या अनुषंगाने सर्वच पक्षांकडुन  विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला  जात अाहे.माजी अामदारांच्या काळात मंजुर केलेली कामे अाता पुर्ण केल्याने त्या कामांची उद्घाटने राष्ट्रवादीकडुन केली जात अाहेत. तर विद्यमान सत्ताधा-यांकडुन देखिल  मंजुर व पुर्ण झालेल्या विकासकामांची उद्घाटने व भुमिपुजनं जोरात सुरु अाहे.या भुमिपुजनांना नागरिकांचा माञ अल्पप्रतिसाद मिळत असुन नागरिक या कार्यक्रमांकडे डोळेझाक करत असल्याचे चिञ दिसते.

विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकिनंतर विरोधक व सत्ताधारी पक्षातील बहुतांशी नेते हे काहि काळ गायब झाले होते.परंतु निवडणुक तोंडावर अाली असल्याने अचानक 'ते'नेते विविध काार्यक्रमांमध्ये दिसुन येउ लागले अाहेत.सर्वसामान्य देखिल अचानक उगवणा-या नेत्यांना पाहुन अचंबित होत अाहेत.या पक्षांकडुन भुमिपुजने व उद्घाटनांचा सध्या एकच  सपाटा लावला जात असुन अाचारसंहिता लागण्यापुर्वीच या कामांसाठी घाई केली जात असुन लाखो- कोटींच्या निधी ची घोषणा होताना दिसत अाहे.

निवडणुकांच्या तोंडावर सुरु असलेल्या उद्घाटनांच्या व भुमिपुजनाच्या  गाव पारावर चर्चा चांगल्याच रंगत असुन निवडणुकांपुर्वी झोपेत असणा-या पुढा-यांना निवडणुका जवळ दिसु लागल्या कि जनतेचा पुळका येणारचं अशा भावना नागरिकांमधुन व्यक्त होत अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या