शिक्रापूरात सर्पमित्राने पकडला इंडियन कोब्रा

शिक्रापुर, ता.९ जानेवारी २०१६(प्रा.एन.बी.मुल्ला) : येथे तळेगाव ढमढेरे येथील सर्पमित्र गणेश बबन टिळेकर या युवकाने अतिविषारी जातीचा पाच फुटी इंडियन कोब्रा नाग पकडला.

सविस्तर हकिकत अशी कि, शिक्रापूर येथील इंद्रप्रस्थ नगर येथे गव्हाच्या पिकात नाग गेला असल्याचे येथील नागरीकांना आढळून आले असता ज्ञानेश्वर बांडे यांनी लगेचच सर्पमित्र गणेश टिळेकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहीती दिली.टिळेकर यांनी तातडीने याठिकाणी धाव घेतली व पाहीले असता तो इंडियन कोब्रा जातीचा अतिविषारी नाग असल्याचे त्यांना आढळले.

टिळेकर यांनी मोठया शिताफीने या नागाला गव्हाच्या पिकातून त्यांनी बाहेर काढले व पकडले.सध्या थंडीचे दिवस असल्याने दुपारच्या वेळेस उबीसाठी साप बाहेर पडत असल्याचे टिळेकर यांनी सांगीतले.परीसरात कोठेही सर्प आढळल्यास घाबरून न जाता 9960516366 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या