शिरूरला चार न्यायाधीश करणार न्यायदान

शिरूर, ता.११ जानेवारी २०१७ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात वाढत्या लोकसंख्येचा व खटल्यांचा विचार  करत  शिरूर न्यायालयात आता अाणखीन एका न्यायाधीशाची नेमणुक करण्यात अाल्याने यापुढे चार न्यायाधीश न्यायदानाचे काम करणार अाहेत.

शिरुर तालुक्यात प्रामुख्याने शिरुर, शिक्रापुर व रांजणगाव गणपती हि महत्त्वाची पोलीस ठाणी असुन शिरुर तालुक्याचा दिवसेंदिवस विस्तार वाढु लागला अाहे.त्याच अनुषंगाने गेल्या काहि महिन्यांपुर्वी वाढत्या खटल्यांचे प्रमाण पाहत एका अतिरिक्त न्यायाधीशाची नेमणुक करण्यात अाली होती.त्यामुळे एकुण तीन न्यायाधीश न्यायदानाचे काम पाहत होते.उच्च न्यायालयाच्या अादेशानुसार अाता अाणखीन एका  न्यायाधीशाची नेमणुक झाली अाहे.

शिरुर न्यायालयात सध्या एस. डी. घनवट हे मुख्य न्यायाधीश, तर श्रीमती एम. ए. आधुके व श्रीमती आर. एन. खान हे सहन्यायाधीश म्हणून कार्यरत असुन  श्रीमती एस. आर. बांदल यांची सहन्यायाधीश म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासाठी न्यायालयात स्वतंञ न्यायकक्षाची स्थापना देखिल करण्यात अाली अाहे.

शिरुर न्यायालयात श्रीमती एस. आर. बांदल यांची नेमणुक झाल्याने शिरुर  बार असोशिएशन च्या वतीने अभिनंदन करण्यात अाले अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या