करडेजवळ रुग्णवाहिकेला अपघात; तिघांचा मृत्यू

करडे, ता. 26 जानेवारी 2017 (सतीश केदारी)- एक रुग्णवाहिका झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (ता. 25) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नाव्हरे येथील एक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन शिरूरकडे निघाली होती. रुग्णवाहिका हॉटेल नानाश्री जवळ असलेल्या एका झाडावर जाऊन जोरात आदळली. यावेळी झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णवाहिकेची धडक एवढी जोरात होती की झाड मोडून रुग्णवाहिकेत घुसले. अपघाताचे कारण समजू शकले नाही.

मृतांमध्ये बापू काळे, सदाशीव मोरे, राणी माने (सर्व रा. नाव्हरे) यांचा समावेश आहे. शिरूरचे पोलिस पुढील तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या