सामुदायिक विवाह सोहळा अर्थात साक्षात अमॄत प्रसाद

शिक्रापूर, ता.३० जानेवारी २०१७ (प्रा.एन.बी.मुल्ला) : सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे साक्षात अमॄत प्रसाद असल्याचे प्रतिपादन श्री श्री शिवसार्इबाबा(बेंगलूर) यांनी केले.

शिक्रापुर येथे सर्वधर्मीय 101 सामुदायिक विवाह सोहळयावे आयोजन करण्यात आले होते.या सोहळयातील नव वधु वरांना आशिर्वाद देण्यासाठी श्री श्री शिवसार्इबाबा उपस्थित होते.याप्रसंगी ते बोलत होते.आत्मसिध्दी, साधना व शांती या त्रिसुत्रीच्या आधारे कोणत्याही कामात यशस्वी होता येते.समाजाचे भले करण्याची मनापासून इच्छा असेल तरच हातून समाजकार्य घडून येते.सुरेशराव भुजबळ यांनी सामुदायिक विवाह सोहळयाच्या माध्यमातून गेली दहा वर्षे केलेले सामाजीक कार्य ही समाजातील गोरगरीबासाठी केलेल्या कामाची पावती आहे असे गौरवोद्गारही यावेळी बोलताना शिवसार्इबाबांनी काढले.

या सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले की सर्वधर्मीय 101 सामुदायिक विवाह सोहळयात विधीपूर्वक विवाह सोहळा पार पाडला जातो व या सोहळयाच्या सर्व खर्चाची जबाबदारी सुरेश भुजबल एकटे पेलत असून त्यांनी शिरूर तालुक्यात नवा इतिहास घडवला असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

या सोहळयास आमदार बाबुराव पाचर्णे, सद्गुरू सुमंतबापू हंबीर, नवोदय विद्यालय समितीचे उपाध्यक्ष सुरेशराव भुजबळ, जि.प.च्या बांधकाम विभागाचे सभापती मंगलदास बांदल, जिल्हा बँकेच्या संचालीका जयश्री पलांडे, शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, शिरूर बाजार समितीचे संचालक रामभाउ सासवडे, राहूल गवारे, काँग्रेसचे कौस्तुभ गुजर, सरपंच अंजनातार्इ भुजबळ, रोहीत खैरे, समता परीषदेचे राज्य संघटक सोमनाथ भुजबळ, बाळासाहेब लांडे, उद्योजक व्यंकटेश चलसानी, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, प्राचार्य रामदास थिटे, संजय केवटे, राजेश धुमाळ, अॅड.भाउसाहेब करपे, पल्लवी भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वव्यापी जनविकास परीषदेचे अध्यक्ष व विवाह सोहळयाचे संयोजक सुरेश भुजबळ यांनी केले.सोमनाथ भुजबळ यांनी सुत्रसंचालन केले तर रामदास थिटे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या