गणपतीमाळ येथे अपघातात एकाचा मृत्यू

मांडवगण फराटा, ता.३१ जानेवारी २०१७ (संपत कारकुड) : वडगाव रासाई ते मांडवगण फराटा दरम्यान गणपती माळ येथे मोटारसायकला कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली.

सविस्तर माहिती अशी कि, सादलगाव येथील जालिंदर रामभाऊ साळुंके हे सोमनाथ अडागळे, गणेश म्हस्के यांच्याबरोबर  बुलेट गाडीवरुन प्रवास करत असताना गणपती माळ नजीक मोटार सायकलला समोरुन अचानक कुत्रे आडवे आले. यावेळी  गाडीवरील नियंञण  सुटुन तिघेही  डांबरी रस्त्यावर जोराने कोसळले.या अपघातात साळुंके  यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यु झाला.अपघाताचे वृत्त कळताच मांडवगण पोलीस चौकीचे हवालदार एस.पी.गुपचे,विक्रम जमादार,योगेश गोलांडे अादींनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस.वाघमोडे हे करत अाहेत.

दरम्यान सोमवारी सकाळी साळुंके यांच्यावर सादलगाव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात अाले असून  गाव वपरिसरामध्ये मध्ये ते मामा या टोपण नावाने प्रसिध्द होतें.घरातील कर्ता पुरुष गेल्याने सादलगाव परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या