रांजणगांव पोलीसांकडुन खंडणीखोर अटकेत

रांजणगांव गणपती,ता.३१ जानेवारी २०१७(प्रतिनीधी) : येथील एमअायडीसीतील कामगाराचे अपहरण करुन  खंडणी मागणा-या दोघांना पोलीसांनी मोठ्या शिताफिने अटक केली अाहे.

या प्रकरणी राहुल दत्ताञय वाखारे(वय.२७), अविनाश वाल्मिक भवर( वय.२५) दोघेही राहणार गोलेगाव (ता.शिरुर) यांना अटक केली अाहे.

रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार(दि.२९) रोजी रांजणगांव वसाहतीतील कामगार सुदीपकुमार श्रीधनीराम अहिरवार (वय-२१,मुळ रा.रगोली, जि.छत्तरपुर, उत्तरप्रदेश) व त्याचा मिञ रोड ने जात असताना दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवरुन येउन मारहाण,दमदाटी करत अहिरवार यास कर्डे घाटात घेउन गेले.त्यानंतर अारोपींनी सुदिपकुमार चा मिञ दिलीप अहिरवार यास फोन करुन सुदिप जिवंत हवा असेल तर पंचवीस हजार रुपये घेउन कर्डे घाटात अाणुन द्या अशा प्रकारे खंडणीची मागणी केली.

या घटनेबाबत पोलीस स्टेशन ला माहिती कळताच, पोलीस निरीक्षक अमरनाथ  वाघमोडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तपासाची सुञे हाती घेत तत्काळ गुन्हा दाखल केला व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील क्षिरसागर, राजु मोमीन, मंगेश थिगळे, मिलिंद देवरे, अमोल नलगे, सुहास पवार,उमेश कुतवळ, किशोर तेलंग, असे पथक तयार करुन अारोपींच्या तपासासाठी पथक रवाना करण्यात अाले.

या वेळी  पोलीसांनी कसुन तपास करत संशयित पल्सर मोटारसायकल चा शोध घेत थरारक पाठलाग केला.यावेळी अारोपींनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीसांनी तत्काळ अारोपींना ताब्यात घेतले.

या प्रकरणी पुढील तपास  पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव पाटील हे करत अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या