भाजपाला शिरुर तालुक्यातुन हद्दपार करा-अजित पवार

न्हावरे, ता.१ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : भाजपा सरकारच्या चुकिच्या धोरणामुळे सर्वसामान्य शेतक-याचे नुकसान होत असुन या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची हीच योग्य वेळ अाली असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी न्हावरे येथे बोलताना व्यक्त केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले कि,भाजपा सरकारच्या अनेक  चुकिच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे जीवन अडचणीत अाले असुन शेतकर्‍यांच्या प्रश्नांशी या सरकारला देणंघेणं नाही.कोटीच्या कोटी  विकासाच्या गप्पा मारल्या जात अाहेत.परंतु तेवढ्या कोटींचा विकास केलेला कोठे दिसत नाही.कोपर्डीतील अत्याचार प्रकरण, मराठा समाज अारक्षण,बैलगाडा शर्यत, अादींबाबत सरकारला गांभीर्य नसुन निर्णय घेण्याची धमकच या सरकारमध्ये नसल्याची जोरदार टिका या वेळी केली.

राज्याचा अर्थमंत्री असताना जिल्हयापेक्षा शिरूर तालुक्याला झुकते माप देत भरीव निधी दिला.त्या मुळेच शिरूर तालुक्याचा सर्वांगिन विकास होउ शकला.या पुर्वी देखिल तालुक्यासाठी काहीही कमी पडू दिलं नाही.तरीही आपल्या उमेदवाराचा पराभव होतो याची खंत वाटते असुन या निवडणुकित सर्वच्या सर्वच जागा निवडुन दिल्यास जिल्हा परिषदेचा लाल दिवा शिरुरला देउ असेही ते म्हणाले.

कोटींचा विकास कुठयं?
शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार बोलताना म्हणाले कि,हजारो कोटींच्या विकासकांची वल्गना करणा-यांनी तो विकास कुठे केला हे दाखवुन द्यावे असे बोलुन शिरुर तालुक्यातील जनता या निवडणुकित त्यांना निश्चितच जागा दाखवुन देइल.या वेळी जिल्हा परिषद प्रदिप कंद,रवीबापु काळे,अादींची भाषणे झाली.

या वेळी जिल्हा बॅंकेचे रमेशआप्पा थोरात, जालिंदर कामठे, प्रदीप कंद, मानसिंग पाचुंदकर, प्रदिप कंद,जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षाताई शिवले, विद्याताई भुजबळ, नरेंद्र माने,नंदू पाटील काळभोर,संगीताताई शेवाळे, लतिका ताई वराळे, पंचायत समिती सभापती सिद्धार्थ कदम,सुधीर फराटे, विजेंद्र गद्रे अादी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या