दोन दिवसांत एकही अर्ज नाही

शिरुर, ता.३ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : जिल्हापरिषद गट व  पंचायत समिती गणांच्या होणा-या निवडणुकीसाठी शिरुर तालुक्यांतुन अद्याप एकहि अर्ज दाखल झालेला नाही.

जिल्हापरिषद गट व  पंचायत समिती गणांच्या होणा-या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास (ता.१) पासून सुरुवात झाली असून  (ता.६) ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अखेरची मुदत आहे. शिरुर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी सावध पविञा घेतला असुन अर्ज दाखल केलेले नाहीत.गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस होता, तर आता फक्त चारच दिवस उरले आहेत. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.तसेच अनेक इच्छुक फॉर्म भरण्यासाठी लागणा-या कागदपञांच्या पुर्ततेत गुंतले असल्याचे दिसते. जोपर्यंत उमेदवारी फिक्स होत नाही असा सुर देखिल अनेकजण अाळवत असुन 'वेट अॅंड वॉच' च्या भुमिकेत अाहेत. त्यामुळे उरलेल्या तीन  दिवसांत नक्की काय काय निर्णय होणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार हे स्पष्ट होणार अाहे.

उमेदवारांना वेळ फार कमी असल्याने अखेर च्या क्षणी चांगलीच धावपळ उडण्याची शक्यता असुन अाज तिस-या दिवशी काहि उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या