तिस-या दिवशी शिरुरला दोन अर्ज दाखल

शिरुर, ता.४ फेब्रुवारी २०१७ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातुन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिसाठी दोन अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी दिली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिसाठी अर्ज भरण्यास(ता.१) पासुन सुरुवात झाली असुन शुक्रवारी तिस-या दिवशी शिरुर ग्रामीण-न्हावरा या जिल्हा परिषद गटातुन विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे यांनी तर मांडवगण पंचायत समिती गणातुन सुनिल दशरथ जाधव यांनी अर्ज सादर केला अाहे.

अाता अर्ज सादर करण्यास अवघे मोजकेच दिवस उरले अाहेत.अर्ज भरण्याची शेवटची मुदत (ता.६) ही असणार अाहे.

उमेदवार गेलेत गोंधळुन
निवडणुकिसाठी उमेदवारी अर्ज अॉनलाईन भरायचा असल्याने अनेक उमेदवारांनी सायबर कॅफे तसेच इतर ठिकाणी धाव घेतली असुन अॉनलाइन प्रक्रिया समजुन घेत फॉर्म भरु लागले अाहेत.यातही कित्येक वेळ खर्ची होत असुन फॉर्म भरुन घेताना गोंधळ उडताना दिसत अाहे.निवडणुक यंञणा देखिल सज्ज असुन तहसिलदार कार्यालय व निवडणुक कक्षाकडुन उमेदवारांच्या प्रत्येक प्रश्नांचे निरसन केले जात अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या