युती अाणि अाघाडीचं तालुक्यात काय होणार ?

शिरुर, ता.५ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : शिरुर तालुक्यात युती व अाघाडीवर अद्याप एकमत होत नसल्याने प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असुन यांवरच सत्तेची गणिते अवलंबुन असणार अाहे.सर्वच पक्ष अंतिम उमेदवार  याद्या सोमवारीच जाहिर करणार असल्याचे बोलले जात अाहे.तर शिरुर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिसाठी प्रथमच प्रचंड उत्सुकता ताणली गेली अाहे.

गेल्या चार दिवसांत शिरुर तालुक्यातुन मोजक्याच उमेदवारांनी अर्ज दाखल केले असुन रविवार व सोमवार हे मोजकेच दिवसअर्ज दाखल करण्यासाठी उरलेले अाहेत.रविवारी सुद्धा अर्ज स्विकारणार असल्याने उमेदवारांमध्ये अानंदाचे वातावरण अाहे.अर्ज दाखल करायला मोजकाच कालावधी असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले नसून यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्ष आपले अधिकृत उमेदवार जाहीर करतील.अद्याप उमेदवारी बाबत संभ्रम निर्माण झाला असल्याने बहुतांश उमेदवार'तळ्यात-मळ्यात'अशाच भुमिकेत अाहेत.

शिरुर तालुक्यात प्रथमच सर्व राजकीय पक्ष स्वताच्या चिन्हावर लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात भाजप,राष्ट्रवादी,शिवसेना,कॉंग्रेस(आय)आदीं सह रासप,बहुजन समाज पक्ष, जनता दल,शेतकरी संघटना आदींचा समावेश असू शकतो.बहुतेक ठिकाणी दुहेरी किंवा तिहेरी लढत पाहवयास मिळणार आहे. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सहा पैक्की पाच जागा जिंकून राष्ट्रवादीने  आपले वर्चस्व सिध्द केले होते.तर पंचायत समितीत बारा पैक्की सहा जागा विरोधी गटाला मिळाल्या होत्या.त्यामुळे पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश मागील निवडणुकीत मिळाले नाही.

राज्यात तुटलेली युती व प्रत्येक पक्षाने घेतलेली 'एकला चलो रे' ची भमिका शिरुर तालुक्यात भाजपा पक्षाला मारक कि तारक ठरते याविषयी चर्चा होताना दिसत अाहे.या वेळेस राज्यात सत्ता  बदल झाली असून,सध्या राज्यात भाजपचे सरकार असून त्यामुळे यावेळेस भाजपला फायदा होईल कि नाही हे काही दिवसानंतर स्पष्ट होणार आहे.तर गट व काही गणामध्ये शिवसेना चांगले आव्हान भाजपा,राष्ट्रवादी समोर उभी करू शकते. त्यामुळे यावेळेस तिहेरी लढतीचा फायदा कोणाला होतो हे पाहणे गरजेचे आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या