सुजाता पवार यांचा झंजावाती प्रचार दौरा

इनामगाव, ता.११ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : वडगांव रासाई-मांडवगण फराटा जिल्हापरिषद गटातील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सुजाता पवार यांचा गटात जोरदार प्रचार सुरु असुन इनामगांव परिसरात झंजावाती दौरा सुरु अाहे.

जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या प्रचारासाठी उमेदवारांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून बहुतांश उमेदवारांनी  प्रचाराला सुरुवात केली असून आता प्रचाराचा  धुराळा उडायला सुरुवात झाली अाहे. वडगांव रासाई-मांडवगण फराटा जिल्हापरिषद गटातील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सुजाता पवार यांनी गणेगाव दुमाला, बाभुळसर, या भागांतील नागरिकांच्या गाठीभेटी घेत झंजावाती प्रचार दौरा केला.

शिरुर तालुक्यातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांना प्रचारासाठी फार कमी कालावधी मिळत असल्याने उमेदवारांनी घर ते घर असा प्रचार सुरु केला अाहे.त्याचप्रमाणे घोंगडी बैठकांना देखिल वेग अाला असुन गावोगावी निवडनुकिचे वातावरण चांगलेच तापु लागले अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या