उमेदवारी अर्ज कोण कोण माघार घेणार ?

शिरुर,ता.१३ फेब्रुवारी २०१७(प्रतिनीधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अाज दिवस असल्याने कोण कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.

शिरुर तालुक्यात पंचायतसमिती च्या गणासाठी व जिल्हा परिषद गटासाठी अनेक मातब्बर रिंगणात उतरले अाहेत.त्याचप्रमाणे अनेक अपक्षांनी देखिल उडी घेतली अाहे.शिरुर तालुक्यात होणा-या निवडनुकांसाठी प्रमुख पक्ष सवता सुभा करत शड्डु ठोकत निवडनुकित  उतरले असल्याने प्रथमच  मोठी चुरस निर्माण झाली अाहे.

जिल्हा परिषद गटांसह पंचायत समिती गणात देखिल अनेकांनी अर्ज दाखल केल्याने अाज माघार घेणा-या उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.शिरुर तालुक्यात होणा-या लढतींचे चिञ देखिल माघार घेतल्यानंतरच स्पष्ट होणार अाज होणा-या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले अाहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या