शिरुरला मंडलाधिकारी लाचप्रकरणी जाळ्यात

अण्णापुर, ता.१७ फेब्रुवारी २०१७ (प्रतिनीधी) : वाळुच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शिरुर च्या मंडलाधिका-यास लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले.

सविस्तर मिळालेली माहिती अशी कि,संबंधित तक्रारदाराचा वाळुचा व्यवसाय असुन वाळु च्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी मंडलाधिकारी सतीश रामदास पंचरास यांनी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची मागणी केली होती.संबंधिताने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या विषयी  तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी गुरुवारी(ता.१६) रोजी राञी पावणेदहा च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परिसरात सापळा रचुन पंचरास यांना लाचेसह रंगेहाथ पकडले.या कारवाईमध्ये लाचचुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिता साळुंके, अरुण घोडके, अादींनी सहभाग घेतला.

नवीन वर्षातील लाचखोरीचे पहिलेच प्रकरण
शिरुर तालुक्यात लाचखोरीच्या प्रकरणात सर्वाधिक महसुलचेच अधिकारी व कर्मचारी गेल्या वर्षात अडकले गेले अाहेत.तर या नवीन चालु वर्षात देखिल पहिलेच लाचखोरीचे प्रकरण हे महसुलचेच उघड झालेले अाहे. शिरुर तालुक्यात वारंवार झालेल्या या कारवायांमुळे महसुलची प्रतिमा पुरती ढासळली जात  अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या