तळेगाव ढमढेरे गटात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

तळेगाव ढमढेरे, ता.२२फेब्रुवारी २०१७ (प्रा.एन.बी.मुल्ला): तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस गटात सरासरी 70 टक्के मतदान झाले असून या गटात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस गटातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, धानोरे, निमगाव म्हाळुंगी, टाकळी भिमा, दहीवडी, पारोडी, उरळगाव, अरणगाव, आलेगाव येथील विविध मतदान केंद्रावर सकाळ पासूनच गर्दी होती.तळेगाव ढमढेरे येथील एका मतदान केंद्रावर तर मतदानाची साडेपाचची वेळ संपल्यानंतर देखील मतदारांची मतदानासाठी रांग लागलेली होती.त्यामुळे तेथील मतदान सुरूच होते.

मतदानासाठी दोन मतदान यंत्रे असल्याने तसेच मोठया गावातील प्रत्येक  केंद्रामधील मतदारांची संख्या 1000 च्या पुढे असल्याने मतदानास वेळ लागत असल्याच्या प्रतिक्रीया मतदारांनी व्यक्त केल्या. या गटात जिल्हा परीषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल, पंचायत समिती सदस्य राजेंद्र भुजबळ यांच्या पत्नी विद्या भुजबळ व जिल्हा दुध संघाचे संचालक बाळासाहेब ढमढेरे यांच्या स्नुषा अंकीता ढमढेरे निवडणूक लढवित आहेत.तळेगाव ढमढेरे पंचायत समिती गणात भाजपचे माजी तालुकाध्यक्ष हरीभाउ जेधे यांच्या पत्नी हेमातार्इ जेधे व राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब नरके यांच्या स्नुषा रोहीणी नरके निवडणूक लढवित आहेत.

तळेगाव ढमढेरे गटात व गणात आजी–माजी पदाधिका-यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मतदान यंत्रात त्यांचे भाग्य बंद झाले आहे.या गटात शिवसेना व अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस गटात मतदानाचा टक्काही वाढल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या गटातील निकालाकडे लागले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या