शिरुर ला घडाळ्याची टिकटिक जोरात ; कमळ माञ कोमेजले

शिरुर, ता.२३ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिसाठी अाज झालेल्या मतमोजनीत राष्ट्रवादी ने निर्विवाद वर्चस्व राखत सत्तेतील भाजपचा दारुण पराभव केला.लोकशाही क्रांती अाघाडी ने तीन व शिवसेनेला एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

शिरुर येथील कुकुडी हॉल येथे जि.प व पंचायत समितीच्या सार्वञिक निवडणुकिसाठी मतमोजनी प्रक्रिया पार पडली.या निवडणुकिसाठी सकाळी दहा वाजलेपासुन मतमोजनीला सुरुवात करण्यात अाली.प्राथमिक निकाल साडेबाराच्या दरम्यान स्पष्ट झाला.शेवटी टपाली मतदान सर्वच पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.भाजपला जिल्हा परिषदेत एकही जागा मिळविता  अाली नाही तर  पंचायत समितीत भाजपला तीनच जागा मिळाल्या. तर लोकशाही क्रांती अाघाडीने करिश्मा दाखवत तीन जागा मिळविल्या.

पंचायत समिती गणातील विजयी  उमेदवारी व पडलेली मते  अर्ज पुढीलप्रमाणे(नांव व मते) :
१) वडगाव रासाई : प्रतिभा सोपान शेलार(राष्ट्रवादी-विजयी)
२)मांडवगण फराटा : राजेंद्र गदादे(भाजप-विजयी)
३) रांजणगाव सांडस : विजय रणसिंग (अपक्ष-विजयी )
४) न्हावरा :   राणी शेंडगे (राष्ट्रवादी-विजयी)
५) तळेगाव ढमढेरे : अर्चना भानुदास भोसुरे (अपक्ष-अंगठी-विजयी
६)कारेगांव :  विश्वास  कोहोकडे (राष्ट्रवादी-विजयी)
७) रांजणगाव गणपती : विक्रम पाचुंदकर (भाजप-विजयी)
८) शिरुर ग्रामीण : अाबासाहेब सरोदे (भाजप-विजयी
९) शिक्रापुर : जकाते जयमाला  (राष्ट्रवादी-विजयी)
१०)सणसवाडी :हरगुडे मोनिका नवनाथ(राष्ट्रवादी-विजयी),
११) केंदुर : सविता प्रमोद प-हाड(राष्ट्रवादी-विजयी),
१२) पाबळ : सुभाष उमाप (राष्ट्रवादी-विजयी
१३) कवठे येमाई : सुभाष पोकळे (शिवसेना-विजयी )
१४)टाकळी हाजी: अरुणा दामुशेठ घोडे(राष्ट्रवादी-विजयी)

जिल्हा परिषदेचे गट पुढीलप्रमाणे(नांव,पक्ष व चिन्ह) :
१)वडगाव रासाई- मांडवगण फराटा :  सुजाता अशोक पवार (राष्ट्रवादी-विजयी),
२) तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस :रेखा  मंगलदास बांदल (अपक्ष-अंगठी-

३)न्हावरा- शिरुर ग्रामीण : , राजेंद्र जगदाळे (राष्ट्रवादी-विजयी),

४)कारेगाव-रांजणगाव गणपती : मनिषा पाचंगे(भाजप), वृषाली विजय शिंदे (अपक्ष-बॅट) स्वाती पाचुंदकर (राष्ट्रवादी-विजयी)

५) पाबळ-केंदुर : सविता एकनाथ बगाटे (राष्ट्रवादी-विजयी),

६) शिक्रापुर-सणसवाडी : कुसुम धैर्यशील मांढरे (राष्ट्रवादी-विजयी)
७) टाकळी हाजी -कवठे : सुनिता गावडे (राष्ट्रवादी-विजयी)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या