Live: संकेतस्थळाचे वृत्त अखेर खरे ठरले'; वाचकांची गर्दी

शिरुर,  ता.२३ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) :राज्यात व जगभरातील वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या शिरुर तालुक्याचे प्रथम संकेतस्थळ असलेल्याwww.shirurtaluka.comने 'शिरुर तालुक्यात धक्कादायक निकाल लागतील?' अशा हेडिंगखाली प्रसारीत केलेले वृत्त अखेर खरेच ठरले असून, मतमोजनीचा अॉनलाईन निकाल दिल्याने दिवसभर संकेतस्थळावर वाचकांनी एकच गर्दी केली होती.

शिरुर येथील कुकुडी हॉल येथे जि.प व पंचायत समितीच्या सार्वञिक निवडणुकिसाठी मतमोजनी प्रक्रिया पार पडली.या निवडणुकिसाठी सकाळी दहा वाजलेपासुन मतमोजनीला सुरुवात करण्यात अाली.प्राथमिक निकाल अर्ध्या तासातच  स्पष्ट झाला.तर दुपारी तीन पर्यंत संपुर्ण चिञ स्पष्ट झाले होते.शिरुर तालुक्यात धक्कादायक निकाल लागतील असा अंदाज संकेतस्थळाने व्यक्त केलेला होता.

त्याच प्रमाणे न्हावरे-शिरुर ग्रामीण गटात राजेंद्र  जगदाळे हे मोठ्या फरकाने विजयी झाले.तर जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, शिवसेनेच्या जयश्री पलांडे,अादींना पराभवाचा मोठा धक्का बसला.नेहमीच सर्वांची धांदल उडविणारे पैलवान मंगलदास बांदल यांनी पत्नी रेखा बांदल यांच्या सह त्यांच्या रांजणगाव गणातील उमेदवारांना विजयी करत राजकारणातील हुकमी एक्का असल्याचे सिद्ध केले. शिरुर चे माजी अामदार अशोक पवार यांनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व पुन्हा सिदध केले.

पंचायत समिती गणातील उमेदवार व पडलेली मते पुढीलप्रमाणे(नांव व मते) :

१) वडगाव रासाई : प्रतिभा सोपान शेलार(राष्ट्रवादी-विजयी,८६५३),उषा पोपट शेलार (शिवसेना-९६७), संगिता राजु शेलार (भाजप-५३५२),
२)मांडवगण फराटा : राजेंद्र गदादे(भाजप-विजयी,६६९७), मच्छिंद्र  गदादे (शिवसेना-५३५), लतिका  वराळे (राष्ट्रवादी-६६५७),
३)रांजणगाव सांडस : काळुराम पुणेकर (भाजप-१५०४) चिंतामन विष्णु येळे (शिवसेना-४३०), सुनिल सात्रस (राष्ट्रवादी-५३४४ ) विजय रणसिंग (अपक्ष-विजयी,६०८२ )
४) न्हावरा :  अंजली शरद बांदल (शिवसेना-१७०८), ताई तांबे (भाजप-४९२६), राणी शेंडगे (राष्ट्रवादी-विजयी,६००४)
५) तळेगाव ढमढेरे : अर्चना भानुदास भोसुरे (अपक्ष-विजयी,,५३७१), छाया लांडे (शिवसेना-७६२),रोहिणी नरके (राष्ट्रवादी-४२८७),हेमा जेधे (भाजप-३०८३),
६) कारेगांव :  विश्वास  कोहोकडे (राष्ट्रवादी-विजयी,७२०३), दादा खर्डे (भाजप-४५७३),निवृत्ती तुकाराम गावडे(कॉंग्रेस-१३२)
७) रांजणगाव गणपती : राजाराम धुमाळ (राष्ट्रवादी-५५७७), विक्रम पाचुंदकर (भाजप-विजयी,६५०६)
८) शिरुर ग्रामीण :  शिवाजी कु-हाडे (रासप-६८), संतोष काळे (शिवसेना-४५५), शामकांत वर्पे (राष्ट्रवादी-५१०१), अाबासाहेब सरोदे (भाजप-विजयी,६९७०),  गजानन कुरंदळे (कॉग्रेस आय-४३९)
९) शिक्रापुर : उषा तानाजी राउत(१८०५), जकाते जयमाला (राष्ट्रवादी-विजयी,४९६२),  शिल्पा निलेश भुजबळ (शिवसे्ना-२०६५ ),
१०) सणसवाडी :हरगुडे मोनिका नवनाथ(राष्ट्रवादी-विजयी,५६७१),सुषमा हरगुडे(भाजप-२८५७),वारघडे सुवर्णा दत्ताञय(शिवसेना-४१९)
११) केंदुर : अंजली प्रफुल्ल शिवले (भाजप-६१८८), शितल चेतन दरेकर (शिवसेना-२६३०), सविता प्रमोद प-हाड(राष्ट्रवादी-विजयी,६२०७),
१२) पाबळ : सुभाष उमाप (राष्ट्रवादी-विजयी,६४७९), सोपान जाधव(शिवसेना-५२३९) नंदकुमार गायकवाड (भाजप-२०८४ ) रामचंद्र वाघोले (कोंग्रेस-१८८)
१३) कवठे येमाई : सुभाष पोकळे (शिवसेना-विजयी,७६७५ )योगेश थोरात (राष्ट्रवादी-५५०९),
१४) टाकळी हाजी : अरुणा दामुशेठ घोडे(राष्ट्रवादी-विजयी,८५५३), योगिता दळवी(कॉग्रेस-१८०) माधुरी बोंबे (शिवसेना-३९७७)

जिल्हा परिषदेचे गटातील उमेदवार व पडलेली मते  पुढीलप्रमाणे(नांव,पक्ष व मते) :
१)वडगाव रासाई- मांडवगण फराटा : छाया दादा फराटे(भाजप-१२४९२), सुजाता अशोक पवार (राष्ट्रवादी,विजयी-१५८५४), जयश्री लिंबाजी साठे (कॉंग्रेस-१४१),स्वाती मचाले (शिवसेना-५५४)
२) तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस :रेखा  मंगलदास बांदल (अपक्ष,अंगठी-विजयी १२९८५), विद्या राजेंद्र भुजबळ (भाजप-४९३६),  अंकिता प्रतिक ढमढरे(राष्ट्रवादी-८४२६), सविता रामदास लांडगे (अपक्ष,८७) चेतना ढमढेरे( शिवसेना-५५४ ), छाया अनिल वडघुले (अपक्ष-६७)
३)न्हावरा- शिरुर ग्रामीण : , राजेंद्र जगदाळे (राष्ट्रवादी-विजयी,१३५२९), अनिल माणिक पवार(शिवसेना-८६१),राहुल पाचर्णे (भाजप-१०८२७), सुभाष कोळपे (कॉग्रेस आय-२८६), रविंद्र निंबाळकर (अपक्ष,१९०)
४)कारेगाव-रांजणगाव गणपती :  मनिषा पाचंगे(भाजप-१००७०), वृषाली विजय शिंदे (अपक्ष-१६३) स्वाती पाचुंदकर (राष्ट्रवादी-विजयी,१३८४७)
५) पाबळ-केंदुर : सविता एकनाथ बगाटे (राष्ट्रवादी-विजयी,११५८९), जयश्री पलांडे (शिवसेना-१०८७६), मंगल भगवान शेळके (भाजप-५९४३), अश्विनी शरद दरेकर (कॉंग्रेस-६२०)
६) शिक्रापुर-सणसवाडी : कुसुम बाळासाहेब खैरे (भाजप-६०२२), कुसुम धैर्यशील मांढरे (राष्ट्रवादी-विजयी,११७०६)
७)टाकळी हाजी- कवठे : सुनिता गावडे(राष्ट्रवादी-१३१०३,विजयी),माधुरी विलास थोरात(शिवसेना-१२६९४)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या