मतदारांनीच त्यांना बळीचा बकरा केले-पवार

निमोणे, ता.२८ फेब्रुवारी २०१७(तेजस फडके) :  न्हावरे-शिरुर ग्रामीण गटात राजेंद्र जासुद यांनी काही कारणास्तव उमेदवारी न घेतल्याने विरोधकांनी राजेंद्र जगदाळे यांना बळीचा बकरा बनविल्याच्या वल्गना केल्या.परंतु मतदारांनी त्यांच्या मुलालाच बळीचा बकरा केला.अशी टिका शिरुर-हवेलीचे माजी आमदार ऍड.अशोक पवार यांनी केली.

करडे (ता. शिरुर) येथे ग्रामस्थांच्या वतीने गावचे माजी अादर्श सरपंच व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे (पाटील) तसेच न्हावरा गणाच्या पंचायत समिती सदस्य राणीताई शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते.

यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत दसगुडे म्हणाले कि, गेल्या अनेक वर्षांत शिरुर ग्रामीणच्या इतिहासात प्रथमच मतदारांनी विरोधात कौल दिला.त्यामुळे हा विजय सुकर झाला.विरोधकांनी राजेंद्र जासुद व माझ्याबद्दल चुकीच्या वावड्या उठविल्या.तसेच अपप्रचार हि केला.शिरुर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे म्हणाले कि,विद्यमान आमदारांनी शिरुर ग्रामीण मध्ये काय विकास केला तसेच त्यांचे पुत्र मागच्या वेळेस ज्या रांजणगाव जिल्हा परिषद गटातून निवडुन आले.तिथे त्यांनी किती कामे केली ते सांगावे.
 
या सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे म्हणाले कि,अशोक पवार आमदार असताना मी सरपंच होतो त्यावेळेस करडे गावाचा सर्वांगीण विकास व कायापालट करण्यात मोठे यश अाले.त्याचप्रमाणे अागामी काळात न्हावरा-शिरुर ग्रामीण जिल्हा परिषद गटातही विकास कामांचा डोंगर उभा केल्याशिवाय राहणार नाही.करडे गावचे माजी सरपंच बाळासाहेब बांदल म्हणाले विद्यमान आमदारांनी या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर केला.त्यामुळेच मतदानाच्या दिवशी त्यांच्या एका समर्थकाने गुनाट येथील बुथवर जाऊन मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.पण गुनाट ग्रामस्थांनी त्याच्या दबावाला बळी न पडता  तिथुन हाकलुन लावलं.

याप्रसंगी माजी आमदार सुर्यकांत पलांडे,ऍड.वसंतराव कोरेकर,मनीषा कोरेकर,सुभाष उमाप,शामकांत वर्पे,शरद पवार,हरीश झंझाड,संतोष घायतडक यांनीही मनोगते व्यक्त केली.तर या कार्यक्रमाला शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र जासुद, करडे गावच्या सरपंच कविताताई जगदाळे,उपसरपंच गणेश रोडे,माजी सरपंच बाळासाहेब बांदल,दामुशेठ घोडे,मंदाताई सरके,जयसिंगराव कर्डीले,बाजीराव कोळपे,तेजस भगत, एकनाथ वाळुंज,शिवाजी वाळुंज,संदीप घुमरे, सोमनाथ बेंद्रे,प्रल्हाद वाळके, कैलास वाळके व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

...अन मिञालाही झाले अानंदाश्रु अनावर

राजेंद्र जगदाळे पाटील आणि राजेंद्र जासुद हे एकमेकांचे जिवलग मित्र.राजेंद्र जगदाळे यांची करडे गावातुन वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली होती यावेळी राजेंद्र जासुद यांना आनंदाश्रू अनावर झाले होते.या वेळी उपस्थित देखिल भावुक झाले होते.

गोरगरीब जनतेचे अार.अार.पाटील

करडे गावचे माजी अादर्श असलेले व नुकतेच जिल्हा परिषदेवर निवडुन अालेले राजेंद्र रणजित जगदाळे पाटील यांची पंचक्रोशीत अार.अार.पाटील अशी ख्याती अाहे.शांत,संयमी व मनमिळावु म्हणुन गोरगरीब जनतेत ओळख असलेल्या जगदाळेंच्या या नावाची चांगलीच चर्चा असुन गरीबांचा नेता निवडणुन अाला अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडुन व्यक्त होत अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या