देशाचे भवितव्य विध्यार्थ्यांच्या हाती- प्रा.मनिषा काशिद

तळेगाव ढमढेरे,ता.३ मार्च २०१७ (जालिंदर अादक) : देशाचे  भवितव्य विध्यार्थ्यांच्या हाती असुन उज्वल भविष्यासाठी तरुण पिढीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्या मनिषा काशिद यांनी बोलताना केले.

तळेगांव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी मातोश्री नॅशनल स्कुल,वारजे पुणे या शाळेचे प्राचार्या मनिषा काशिद बोलत होत्या.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. साहेबराव ढमढेरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.तर यावेळी पी.एच.डी  डॉ.पराग चौधरी, डॉ.मनोहर जमदाडे यांना पदवी प्रदान करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात महेश ढमढेरे म्हणाले कि,ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करून हि संस्था उभी केली आहे याचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा.सास्कृतिक विभागातील झालेल्या स्पर्धेंमध्ये मेहंदी स्पर्धा, काव्यवाचन व गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते २०१६-२०१७ सालात अंतरमहाविध्यालायीन स्पर्धेत मुले ४४ व मुली ७ स्पर्धेत भाग घेतला होता आंतरविभागीय स्पर्धेत ९ मुले तर ३ मुलीनी भाग घेतला होता अंतरविधयापीठ स्पर्धेत १ मुलगा व १ मुलगी अश्या विध्यार्थ्यानी सहभाग घेतला होता, आज वरील सर्वाना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.         

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, पंचायत समितीच्या सदस्या अर्चना भोसुरे, तळेगाव ढमढेरेचे सरपंच ताई सोनवणे,धानोरेचे माजी सरपंच भरत भोसुरे, महाविध्यालायाचे प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील, उपप्राचार्य डॉ.संदीप सांगळे, डॉ.मनोहर जमदाडे, डॉ.पराग चौधरी, प्रा. सीमा कोष्टी प्रा.सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय वाबळे  प्रस्ताविक केले तर डॉ.पराग चौधरी यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या