मुलींनो अात्मनिर्भर बना- फौजदार अनिता होडगे

इनामगांव, ता.४ मार्च २०१७(प्रतिनीधी) : मुलींनो तुम्ही अबला नसुन सबला अाहात.समाजातील विकृत परिस्थितीचा सामना करण्यासाठी अात्मनिर्भर बनण्याची गरज असल्याचे मत फौजदार अनिता होडगे यांनी मुलींना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

इनामगांव(ता.शिरुर) येथील न्यु इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थीनींना पोलीस उपनिरीक्षक अनिता होडगे यांनी निर्भया पथकाच्या वतीने नुकतेच मार्गदर्शन केले.

या वेळी मुलींना कराटे, काठी, मिरची पुड, अादींचा वापर करत स्वरक्षण कसे करायचे याचे धडे त्यांनी दिले.होडगे बोलताना म्हणाल्या कि, समाजात दिवसेंदिवस महिलांना अबला समजुन दुय्यम वागणुक दिली जाते.तसेच गप्प राहुन देखिल अत्याचारात वाढ होत अाहे.समाजातील मुलींनी अाता गप्प न राहता अात्मनिर्भर बनणे गरजेचे असुन अत्याचाराविरुद्ध अावाज उठवण्यासाठी पुढाकार घ्यावा.स्वरक्षणाचे धडे घेउन सक्षम झाले तरच समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल असेही त्या म्हणाल्या.

...तर थेट संपर्क साधा
समाजातील विकृतांकडुन ञास झाला तर मुली व महिलांनी गप्प न बसता पुढे यावे.यासाठी शिरुर पोलीस सदैव तत्पर असुन स्वत: ९८७०२८६६९९ या माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे अावाहन त्यांनी उपस्थित मुलींना केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या