शिरुरला भिशीतुन महिलांची फसवणुक

शिरुर,ता.७ मार्च २०१७ (प्रतिनीधी) : शिरुरला भिशीतुन अनेक महिलांची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर अाला अाहे.

या प्रकरणी सुलताना सय्यद(रा.सय्यदबाबानगर,शिरुर) यांनी फिर्याद दिली अाहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१४ मध्ये मंदा बरदे (रा.सिद्धार्थनगर) व अशोक कु-हे(रा.रामलिंग रोड,शिरुर) या दोघांनी मिळुन मंदा बरदे यांच्या घरी मासिक भिशी सुरु केली होती.फिर्यादी यांच्यासह शिरुर शहरातील सुमारे ६० ते ६५ महिलांना व पु्रुषांना सांगुन दरमहा २००० रुपये घेउन भिशी चालवण्यात येत होती.चिठ्ठीद्वारे निघेल त्याला सर्वांचे जमलेली रक्कम देण्यात येत होती.

सुमारे १२ महिण्यांपासुन सय्यद यांच्यासह इतर महिलांनी मंदा  बरदे व अशोक कु-हे यांच्याकडे सर्वांचे एकुण ४४००० रुपये दिले.त्यानंतर अॉगस्ट २०१६ मध्ये बरदे व कु-हे यांनी नातेवाईकांच्या नावे चिठ्ठ्या काढुन सर्व रक्कम अापाापसात घेतली. व मंदा बरदे हि घर सोडुन निघुन गेली.तर साथीदार अशोक कु-हे याच्याकडे वारंवार मागणी करुनही पैशाबाबत  टाळाटाळ केली.या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन ला अारोपींविरुद्ध फसवणुकिचा गुन्हा दाखल झाला अाहे.पै-पै जमा करुन भिशीत गुंतवणुक करणा-या या गोरगरिब महिलांना या प्रकाराने चांगलाच धक्का बसला अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या